North Goa : उत्तर गोव्यातील नदी, धबधब्यांवर जाताय? जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची सूचना

याबाबतचे प्रसिध्दिपत्रक आज उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्द करण्यात आले.
Waterfall
Waterfall Dainik Gomantak

North Goa Collector : उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी स्थानिक नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी सार्वजनिक सूचना जारी केली आहे. याबाबतचे प्रसिध्दिपत्रक आज उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्द करण्यात आले.

Waterfall
'हर घर तिरंगा अभियान 2.0'; पणजी, मडगावातील पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार राष्ट्रध्वज

उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी सार्वजनिक सूचना जारी केली असून स्थानिक आणि पर्यटकांना पावसाळ्यात पाणवठे, तलाव, नद्या, धबधबे, खाणींच्या खड्ड्यांमध्ये पोहण्यास तसेच आंघोळ करण्यास जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

या ठिकाणी जर कोणीही बुडण्याचा प्रकार घडत असेल तर खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन खात्यामार्फत करण्यात आले आहे.

जिल्हा नियंत्रण कक्ष - 2225383/2426578

आपत्कालीन सेवा - 112

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा - 101/2225500

राज्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी धारबांदोडा तालुक्यातील दावकोण येथील पाण्याने भरलेल्या चिरेखाणीत एका 20वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हा आत्महत्येचा प्रकार की खुनाचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com