Viral Video: 'गोवा फार दूर नाही, आजारी शिक्षकाला भेटण्यासाठी थोडा वेळ काढ,' काँग्रेस नेत्याची किंग खानला अखेरची विनंती

Viral Video: जरिता यांनी सुपरस्टारला त्याचे आजारी माजी शिक्षक एरिक डिसोझा यांना भेटण्याची विनंती केलीय.
shah rukh khan
shah rukh khanDainik Gomantak

Viral Video

बॉलिवूडमधून आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख पहिल्यांदाच त्याची लाडकी मुलगी सुहाना खानसोबत दिसणार आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या जरिता लैतफ्लांग यांनी तिच्या X (ट्विटर) हँडलवर शाहरुख खानला एक आवाहन केले आहे. त्यांनी सुपरस्टारला त्याचे आजारी माजी शिक्षक एरिक डिसोझा यांना भेटण्याची विनंती केलीय.

काँग्रेस नेत्या जरिता यांनी अभिनेता शाहरुखला एरिक यांच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. जरीताने एक व्हिडिओ संदेश देखील जारी केला आहे, ज्यामध्ये तिने एरिकची प्रकृती बिघडत असल्याचे सांगितले आणि शाहरुखला गोव्यात येऊन भेटण्याची विनंती केली.

व्हिडिओमध्ये काँग्रेस नेत्या एरिकला शाहरुखचा गुरू म्हणत आहेत. 'कृपया तुमच्या व्यस्त कामकाजातून काही वेळ काढून त्यांना भेटायला या. मुंबईपासून गोवा फार दूर नाही. फ्लाइटने फक्त एक तास लागतो. त्यांची तब्येत बिघडली असून ते आता बोलू शकत नाहीत, असे जरिता यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

shah rukh khan
UEFA Euro 2024: ज्युड बेलिंगहॅमचा शानदार हेडर, इंग्लंडचा सर्बियाविरुद्ध 1-0 असा विजय

'हे माझे शेवटचे आवाहन आहे, शाहरुख पर्यंत पोहोचण्याचा माझा शेवटचा प्रयत्न आहे. भावाची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे, प्रत्येक क्षणाला त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे. मुंबईतून गोव्याला विमानाने फक्त एक तास वेळ लागतो. DASU ने आपल्या सर्वांच्या जीवनावर अमिट छाप सोडली आहे, असे कॅप्शन काँग्रेस नेत्या जरिता यांनी लिहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com