Online Pooja in Goa's Temple: गोव्याच्या मंदिरांमध्ये आता जगातून कुठूनही करा पूजा; जाणून घ्या सविस्तर...

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली माहिती; होम स्टे धोरण लवकरच जाहीर करणार
Online Worship in Goa's Temple
Online Worship in Goa's TempleDainik Gomantak
Published on
Updated on

Virtual Worship to be perform in Goa's Temple: गोव्यात समुद्रकिनारे, चर्चेस, मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक देशासह जगभरातून येत असतातच. पण गेल्या काही काळात गोवा सरकारकडून राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच क्रमात आता गोव्यातील विविध मंदिरांमध्ये ऑनलाईन पुजेची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

गोव्यातील जुन्या मंदिरांमध्ये पर्यटकांना अशी आभासी (व्हर्च्युअल) पूजा करण्याचा पर्याय दिला जाईल, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, गोव्यातील मंगेशी, कवळे, रामनाथी येथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी दरवर्षी पर्यटक, भाविकांची मोठी गर्दी असते.

Online Worship in Goa's Temple
Tourist Assaulted in Goa: महिला सोबती देतो, असे सांगून शिमल्याच्या पर्यटकाला लुटले; नाईटक्लबमध्ये जबर मारहाण

ऑनलाईन पुजेच्या सुविधेमुळे जगातून कुठूनही गोव्यातील कुलदैवताची, देवतेची ऑनलाईन पूजा करणे भाविकांना शक्य होणार आहे. एकदा याबाबतच सूत्र ठरले की, त्यानंतर फोंडा तालुक्यासह इतर तालुक्यांतील प्रसिद्ध मंदिरांच्या व्यवस्थापन मंडळांना यात सहभागी होण्याची विनंती केली जाणार आहे, असे खंवटे यांनी म्हटले आहे.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, "कोणत्याही मंदिर समितीला या योजनेचा भाग व्हायचे नसेल तर आम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करणार नाही. या महिन्यात, आम्ही ऑनलाइन पूजा करण्याची सेवा देण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहोत."

रोहन खंवटे म्हणाले की, भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांपैकी 20 ते 30 टक्के पर्यटक योगासाठी येतात. गोव्यातही योगाचे विविध वर्ग भरवले जातात आणि त्यात परदेशी पर्यटक सहभागी होतात.

आम्ही पर्यटकांना तांबडी सुर्ला मंदिराविषयी सांगतो, तेव्हा आम्ही त्यांना तिथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या दुधसागर धबधब्याविषयीही सांगू.

Online Worship in Goa's Temple
Bilawal Bhutto India Visit: बिलावल यांचं आजोळ आणि गोव्याचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये? पाकिस्तानमध्ये आहे गोमंतकीयांची वस्ती...

पर्यटन विभाग होम स्टे धोरण लवकरात लवकर जाहीर करण्यास उत्सुक आहे. होम स्टे धोरण कार्यान्वित झाल्यावर त्यातून महिला सक्षमीकरणाचे मार्ग देखील उघडतील. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

AirBnB सोबत करार आधीच केला गेला आहे. एजन्सीकडे मानक कार्यपद्धती असतील. ज्या महिलांना त्यांच्या गावात होम स्टे सुविधा द्यायची आहे त्यांना प्रशिक्षणदेखील दिले जाईल. या भागात योगासने केंद्रे असावीत, अशीही आमची इच्छा आहे.

टुरिस्ट डेस्टिनेशनचे विविध पैलू पद्धतशीरपणे मांडण्यासाठी कारवाँ पॉलिसी आणि हेरिटेज पॉलिसीदेखील लवकरच जाहीर करणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com