Goa Taxi : आता राज्याला बेकायदा दलालगिरीतून मुक्त करण्याची गरज; टॅक्सी लोकार्पणाबाबत पर्यटन मंत्र्यांचा मोठा खुलासा

‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हे गोव्यासाठी गेम चेंजर
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुटमधील सर्व बेकायदा गोष्टी व डान्सबार हे कामयचे बंद होतील, याच्या उपाययोजना स्थानिक पंचायत व आमदारांनी करावी. या टाऊट्स व बेकायदा दलालगिरीमुळे गोव्याची बदनामी होत आहे. पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त झाला असून आता राज्याला या बेकायदा दलालगिरीतून मुक्त करण्याची वेळ आल्याचे परखड मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.

Rohan Khaunte
Goa Airport : दाबोळीने रचला नवा इतिहास; एकाच दिवसांत उतरली 100 विमाने

सोमवारी म्हापसा येथील प्रशासकीय इमारतीसमोरील गोवा मुक्ति दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. गोवा टॅक्सी अ‍ॅपचे लाँचिंग लवकरच करण्यात येईल. कळंगुटमध्ये बेकायदा नाईट क्लब, वेश्या व्यवसाय, डान्सबार सुरु होते. मात्र आताच पंचायत व आमदारांना जाग आली असून ते कारवाई करत आहेत. याविषयी मी सुरवातीपासून आवाज उठवत होतो. तरी पंचायतीची सदर कारवाई स्वागतार्ह आहे. हे बेकायदा प्रकार बंद होण्याची नितांत गरज असून यातून गोव्याच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होतोय, असे मंत्री खंवटे म्हणाले.

‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हे गोव्यासाठी गेम चेंजर ठरेल. मात्र, या विमानतळाचा फायदा इतर शेजारील राज्यं घेऊ शकतात. सध्या मालवण, कारवारचा विकास होत असून तिथे वॉटर स्पोटर्स सुरु झालेत. सध्या गोव्यात किनारेच उरलेले नाहीत, त्यामुळे सरकारकडून किनार्‍यांवरील अतिक्रमणे हटविली जात आहे. लोकांनी दिलेल्या जागेतच व्यवसाय करावा. कुणीही सीआरझेडचे उल्लंघन करु नये, असे आवाहन त्यांनी केले.

Rohan Khaunte
Goa Liberation : गोवा म्हणजे फक्त कसिनो आणि दारु नव्हे

गोवा टॅक्सी अ‍ॅप या सेवेचे स्वरुप बनवून तयार आहे. आयटी विभागाने अ‍ॅपची रचना व इतर सोपस्कार पूर्ण केलेत. लवकरच किंबहुना नवीन वर्षांत या सेवेचे लोकार्पण होईल. यासंदर्भात मुख्यमंत्री हे पर्यटन, आयटी व वाहतूक विभागाची संयुक्त बैठक घेऊन या अ‍ॅपचे लाँचिंग करणार, अशी माहिती पर्यटनमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, या ध्वजारोहण कार्यक्रमावेळी पोलीस, शालेय विद्यार्थ्यांचे संचलन झाले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुलांनी सादरीकरण केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com