Goa Liberation : गोवा म्हणजे फक्त कसिनो आणि दारु नव्हे

गोवा म्हणजे कॅसिनोतून पैसा, बाटलीतून दारू आणि बाईतून सुख पुरवणारे राज्य नाही. ही आमची ओळख नाही, हे गोव्याचे रूप नाही.
Goa Tourism| Goa News
Goa Tourism| Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारच्या महिला आणि बाल कल्याण खात्याने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीजच्या माध्यमातून केलेल्या एका अभ्यासानुसार गोवा हे वेश्याव्यवसायाचे आगर बनल्याचे समोर आले आहे. गोव्याचे हे हिडीस रूप, गोमंतकीयांना पहिल्यांदाच याची देही, याची डोळा पाहावे लागत आहे.

दारू आणि कॅसिनो यावर बेतलेला पर्यटनाचा हिडीस चेहरा, आपले रागरंग दाखवू लागला आहे. ही घाण आज आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहे. याची दुर्गंधी अनेक वर्षांपूर्वी येऊ लागली होती. गेली अनेक वर्षे अनेक सामाजिक संस्था हेच सांगायच्या तेव्हा सामाजकारणी, राजकारणी यांपैकी कुणीच या विषयाला गांभीर्याने घेतले नाही. गोव्याला व गोमंतकीयांना जग कशा नजरेने पाहते, याचा आरसा या अहवालाने दाखवला आहे.

बायणा हे एकच स्थान या व्यवसायासाठी कुप्रसिद्ध होते. तेथील वेश्यावस्ती जेव्हा हटवण्यात येत होती, तेव्हा ‘वस्ती नष्ट केली तर हा व्यवसाय निवासी संकुलांपर्यंत पोहोचेल’, अशी भीती काही विचारवंतांनी व्यक्त केली होती, ती खरी ठरत आहे. या अहवालातील आकडेवारी ही प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनांच्या केवळ पाच ते दहा टक्केच आहे. यावरून वास्तवात ही समस्या किती गंभीर झाली आहे, याचा अंदाज येतो.

मानवी तस्करी विरोधी पथके दोन्ही जिल्ह्यांमध्ये आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मानवी तस्करीच्या अनेक घटना घडत असतात, पण किती पीडित मुलींना यातून सोडवले जाते? आकडे सांगतात, 2014(87), 2015(79), 2016(86), 2018(102), 2019(87), 2020(35), 2021(38) आणि 2021 ते आत्तापर्यंत फक्त 19 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. कोविडपूर्वी सुटका करण्याची सरासरी 100 मुली एवढी होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा मानवी तस्करी खूपच वाढली, वेश्याव्यसायातील आर्थिक उलाढालीचे प्रमाण प्रचंड वाढलेे. ही बाब लक्षांत घेता, फक्त 19 मुलींची सुटका होते, यावरून सरकारी यंत्रणाच वेश्याव्यवसाय पोसत असल्याचे स्पष्ट होते.

यातून एक चित्र उभे करण्याचा प्रयत्न होतोय की, गोव्यातील मानवी तस्करीचे प्रमाण अत्यल्प आहे. सोडवलेल्या मुलींच्या संख्येवरून या व्यवसायात प्रत्यक्ष ओढल्या गेलेल्या मुलींची संख्या कमी आहे, असे म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही.

Goa Tourism| Goa News
Goa Liberation : गोव्यातील फुटबॉलप्रेमी पोर्तुगालला का पाठिंबा देतात?

‘बाहेरून मुली, महिला आणून येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या शारीरिक गरजा भागवण्याचा व्यवसाय’, असे म्हणून त्याची तीव्रता कमी करणे ही आत्मवंचना ठरेल. अहवालात म्हटल्याप्रमाणे गोवा हे वेश्याव्यवसायाचे

‘स्थान’ न राहता, गोवा वेश्याव्यवसायाचा ‘स्रोत’ बनत चालला आहे. गोव्यातील महिला कुठल्या भागात वेश्या म्हणून उपलब्ध आहेत त्या गावांची नावे अनेक संकेतस्थळांवर उघडपणे उपलब्ध आहेत.

गोव्याची प्रतिमा, ‘बाई, बाटली आणि जुगार’, अशी होण्यामागे यातील व्यावसायिक जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच सरकारही आहे. ‘पर्यटन’ हा एक प्रमुख व्यवसाय असलेली अनेक राज्ये आहेत, पण त्यांची प्रतिमा गोव्यासारखी नाही. वेश्याव्यवसाय, मानवी तस्करी, अंमलीपदार्थांची लागवड आणि विक्री ही सर्व या चुकीच्या पर्यटन धोरणाला आलेली विषारी फळे आहेत. गोव्याची प्रतिमाच अशी तयार झाली आहे की, दर्जेदार पर्यटक गोव्यात येणे टाळतात.

गोवा म्हणजे कॅसिनोतून पैसा, बाटलीतून दारू आणि बाईतून सुख पुरवणारे राज्य नाही. ही आमची ओळख नाही, हे गोव्याचे रूप नाही. मानवी तस्करांना मदत करणाऱ्या हवालदारापासून चुकीची धोरणे राबवणाऱ्या मंत्र्यांपर्यंत सर्वांनी, ‘आपल्या घरातही एक मुलगी आहे’ ही गोष्ट लक्षांत ठेवावी. परराज्यांतून येथे येणाऱ्या प्रत्येक मुलीला माहेरी आल्यासारखे वाटावे. समृद्ध लोकसंस्कृतीचा शालीन पदर डोक्यावरून घेतलेले, अतुलनीय निसर्गसौंदर्य लाभलेले आणि आईच्या मायेने साळीचा भात अगत्याने वाढणारे आदारातिथ्य असलेले गोव्याचे हे खरे रूप जगासमोर आणा.

-प्रसन्न बर्वे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com