Goa Airport : दाबोळीने रचला नवा इतिहास; एकाच दिवसांत उतरली 100 विमाने

देशातील 50 विषम प्रमुख विमानतळांपैकी दाबोळी आठव्या क्रमांकावर
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवाशांमध्ये कमालीची वाढ झाल्याने दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी दाबोळी विमानतळाने जवळपास 100 आगमन आणि 99 निर्गमने नोंदवली गेली आहेत. देशातील 50 विषम प्रमुख विमानतळांपैकी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ आठव्या क्रमांकावर आहे.

Dabolim Airport
INS Mormugao : आयएनएस मुरगाव देशाची किनारपट्टी अधिक सुरक्षित

शनिवारी, विमानतळाने सात आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह 88 विमानांची आगमन आणि निर्गमने हाताळली. स्टेकहोल्डर्स आणि एएआय अधिकाऱ्यांनी सांगितले की,आंतरराष्ट्रीय चार्टर फ्लाइट्समध्ये झालेली वाढ आणि देशांतर्गत बाजारपेठेतील पर्यटनाचा कल यामुळे पर्यटकांनी सणासुदीच्या हंगामात गोव्याला भेट दिली आहे.

18 डिसेंबरला रविवारी, गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 100 विमानांची आगमने आणि 99 विमानांची निर्गमने नोंदवली गेली. यात एकूण प्रवासी 31, 965 (16046 आगमन आणि 15919 निर्गमन) होते, जे अलीकडच्या काळातील सर्वाधिक आहे.

Dabolim Airport
Dabolim Airport : दाबोळी विमानतळाचं भवितव्य काय? वाहतूक मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

"प्रवासी वाहतुकीतील वाढ सातत्याने उच्च आहे. कोणतेही स्लॉट उपलब्ध नाहीत परंतु आंतरराष्ट्रीय चार्टर अजूनही विचारत आहेत आणि अर्ज करत आहेत असे गोवा विमानतळ संचालक एसव्हीटी धनमजय राव यांनी यांनी सांगितले. राव म्हणाले की, आजपर्यंत एकाही देशांतर्गत विमान कंपनीने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा थांबवण्याचे संकेत दिलेले नाहीत. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिध्द केले आहे.

ह्या वर्षी 2 जानेवारीला, नवीन वर्षाच्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पर्यटकांचा ताफा निघाला. विमानतळाची क्षमता मर्यादित असल्याने एकाच दिवसात 102 आगमनांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. कोविड काळात, गोव्याने जवळपास 17 शहरांसाठी थेट उड्डाणे ऑफर केली होती. ज्यात जवळपास देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही एकूण 90 उड्डाणे सोड गेल्या होत्या, ज्याची संख्या दुप्पट करण्याचे नवीन विमानतळाचे उद्दिष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com