'कळसकोंड' धबधब्यावर पर्यटनास बंदी; लाडफे ग्रामस्थांचा निर्णय

डिचोली (Dicholi) तालुक्यातील लाडफे (लाटंबार्से) येथील "कळसकोंड" (Kalascond ) धबधब्यावरील पावसाळी पर्यटनावर आता निर्बंध येणार आहेत.
Kalascond
KalascondDainik Gomantak
Published on
Updated on

गावचे नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक महत्व असलेल्या डिचोली (Dicholi) तालुक्यातील लाडफे (लाटंबार्से) येथील "कळसकोंड" (Kalascond ) धबधब्यावरील पावसाळी पर्यटनावर आता निर्बंध येणार आहेत. पर्यटनाच्या (tourism) नावाखाली या धबधब्यावर चालणारा धुडगूस त्यातच अस्वच्छतेचे प्रकार वाढल्याने हा धबधबा पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय श्री सातेरी केळबाय देवस्थान समिती (Sateri Kelbay Devasthan Samiti) आणि ग्रामस्थांनी घेतला आहे. या धबधब्याकडे जाणारी वाटही ग्रामस्थांनी अडथळे निर्माण करून बंद केली असून, धबधब्यावर येण्यास बंदी आदी आशयाचे सूचना फलकही त्याठिकाणी लावले आहेत. दरम्यान, रविवारी या धबधब्यावर आलेल्या पर्यटकांना पोलिसांच्या (police) मदतीने ग्रामस्थांनी पिटाळून लावल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली.

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध

मागील काही वर्षांपासून लाडफे येथील "कळसकोंड" हा धबधबा प्रकाशझोतात आला आहे. पावसाळा सुरु झाला की, लाडफे गावातील पवित्र अशा "कळसकोंड" येथील धबधबधबा घसघसून वाहतो. पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी विविध भागातून पर्यटक या धबधब्याला भेट देतात. रविवारी आणि अन्य सुटीच्या दिवसांनी तर या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी उसळत असते.

Kalascond
Goa: जागतिक किर्तीचे हॉटेल व्यवसायिक टिटोस गोवा सोडणार

या धबधब्यावर पर्यटनाची मजा लुटण्यासाठी गटांने येणाऱ्या पर्यटकांकडून धांगडधिंगाणा घालण्यात येत असतो. बरेचजण या धबधब्याच्या ठिकाणी बिअर आदी मद्यप्राशन करतात. मांसाहारी पदार्थही सेवन करतात. मद्य ढोसल्यानंतर पर्यटकांकडून मद्याच्या रिकाम्या बाटल्या तसेच शिल्लक खाद्यपदार्थ आणि टाकाऊ वस्तू त्याचठिकाणी टाकून देण्यात येतात. त्यामुळे धार्मिक महत्व असलेल्या या धबधबा परिसरात अस्वच्छता निर्माण होत असते. अशी माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली.

धार्मिक महत्व

'कळसकोंड' धबधबा हा पवित्र जागृत देवस्थान परिसर आहे. शिमगोत्सवात साजरा होणाऱ्या कळसोत्सवावेळी देवींचे कळस याठिकाणी येतात. 'कळसकोंड'मधील पाणी पवित्र तीर्थ म्हणून गावाला देण्यात येते. तशी परंपरा पूर्वापारपासून चालत आली आहे. यामुळे या परिसराला पावित्र्य असल्याचे स्पष्ट होत आहे. याठिकाणी मद्यप्राशन आणि मांसाहारी पदार्थ वर्ज्य आहेत. अशी माहिती गावातील ज्येष्ठ नागरिक 'कळसकोंड' धबधब्यावरील पर्यटकांच्या धांगडधिंगाण्यावर नियंत्रण येण्यासाठी त्याठिकाणी पोलिस गस्त आवश्यक असल्याचे मत सातेरी केळबाय देवस्थानचे अध्यक्ष विठू मळीक यांच्यासह तुषार मळीक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात पोलिसांना निवेदन देवून तशी मागणी करण्यात येणार असल्याची माहितीही देवस्थान समितीतर्फे देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com