Goa Politics: सासष्टीत 863 जणांचे भवितव्य सील!

लढाई वर्चस्‍वाची : तालुक्‍यातील 33 पंचायतींसाठी 68.33 टक्के मतदान
Vote
Vote Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: एकूण सहा विधानसभा मतदारसंघात विभागल्या गेलेल्या सासष्टी तालुक्यातील 33 पंचायतींसाठी आज एकूण 68.33 टक्के मतदान झाले. तब्‍बल 863 उमेदवारांचे राजकीय भविष्य मतपेटीत सील झाले आहे. सासष्टी हा राजकीयदृष्टीने महत्वाचा तालुका असल्याने या तालुक्यावर आपले वर्चस्व असावे यासाठी सगळ्याच आजी-माजी राजकारण्यांनी आपले वजन पणाला लावले असले तरी कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव आणि नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर सोडल्यास इतर कोणत्याही आमदाराने या निवडणुकीत सरळ भाग घेतला नव्हता.

(total of 68.33 percent polling for 33 panchayats in Sasashti taluka divided into six assembly constituencies today)

Vote
Goa Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ?

या निवडणुकीत बेताळभाटीतून माजी आमदार मिकी पाशेको यांची पत्नी व्‍हियोला पाशेको, नुवेचे माजी आमदार बाबाशान डिसा यांच्या पत्नी फ्रेडा आणि वार्का पंचायतीतून चर्चिल आलेमाव यांची कन्या शेरॉन या तीन हायप्रोफाईल महिला उमेदवार उभ्या राहिलेल्या असल्याने या तिन्ही पण पंचायतींच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या तालुक्यातील बहुतेक पंचायतींत सरासरी 65टक्के मतदान झाले असले तरी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या वेळ्ळी पंचयतीतून 65,95 टक्के एव्हढे मतदान झाले. या पंचायतीचे माजी सरपंच आणि काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष सवियो डिसिल्वा यांनी आपले पॅनल उभें केले असून त्या विरोधात सर्वपक्षीय पॅनल उभे होते. केळशी (76.63%), व पारोडा (75.12%),वेर्णा (74.13%), रुमडामळ (74.14%), दवर्ली (72.24%) कोलवा (70.60%) लोटली (70.38%), नागवा (72.19%) नुवे (72.77%) ओर्ली (70.57%) राशोल (70.48%) असे 70टक्क्यांच्या वर मतदान झाले.

रेल्वे मार्ग रुंदीकरण विरोध हा पंचायत निवडणूकीचा मुख्य मुद्दा असलेल्या सां जुझे द आरियाल या पंचायतीत 72.14 टक्के मतदान झाले असून हे मतदान कुंकळ्ळीचे माजी आमदार क्लाफास डायस यांचे महत्व कमी ठरविणारे ठरेल असा अंदाज आहे.

Vote
Aazadi Ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्यसैनिकांचा आज पणजी येथे होणार गौरव

चर्चिल कन्या शेरॉन उभ्या असलेल्या वार्का पंचायतीत 70.42 % मतदान झाले असून येथे चर्चिल आलेमाव याना आपले अस्तित्व सिद्ध करण्यास धडपड करावी लागणार आहे. या निवडणुकीत आपण सरळ पडलेलो नाही पण जे जिंकून येणार ते आपले उमेदवार असे आलेमाव म्हणाले. येथे त्यांना व्हेंझी व्हिएगस हे शह देणार आहेत.

भाजपचे नेते सत्यविजय नाईक यांनी बंडखोरी करून भाजप पॅनलच्या विरोधात स्वतःचे पॅनल उभे केलेल्या आके बायश पंचायतीत फक्त 62.53 टक्के मतदान झाले असून त्याचा फायदा सत्यविजय यांना मिळेल की भाजप पॅनलला हे पाहावे लागेल. नावेलीत आम्ही सर्व पंचायती जिंकू अशी प्रतिक्रिया आमदार उल्हास तुयेकर यांनी व्यक्त केली. सारझोरा पंचायतीत सर्वात कमी म्हणजे 60.98% मतदान झाले आहे.

राजकीय गणिते ठरतील

सासष्‍टीत राजकीय पटलावर काही बदल होत असल्‍याचे गत विधानसभा निवडणुकीतून स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक महत्‍वाची मानली जात आहे. आमदारांनी आपले समर्थक निवडणूक यावेत, यासाठी कंबर कसली होती. वेळ्ळी, बाणावली येथून विधानसभेत आपने खाते उघडल्‍याने किमानपक्षी त्‍या मतदारसंघांत तरी पंचायत निवडणुकीत आपची जादू कायम राहते का, याकडे अनेकांचे लक्ष आहे. तालुक्‍यात 33 पंचायतींसाठी झालेल्‍या निवडणुकीचा निकाल काय लागतो, यावरून पुढील राजकीय गणितेही ठरू शकतील.

पंचायतनिहाय टक्केवारी

  • आंबेली ६३.७६

  • आके - बायश ६२.५३

  • असोलणा ६३.९२

  • बेतालभाटी ६९.७०

  • कामुर्ली ६७.४५

  • काना बाणावली ६५.२२

  • करमणे ६४.९२

  • केळशी ७६.६३

  • चांदर ६६.३७

  • चिंचोणे ६४.७०

  • कोलवा ७०.६०

  • कुडतरी ६४.९५

  • दवर्ली ७२.२४

  • धर्मापूर ६६.०२

  • गिर्दोली ६५.९४

  • लोटली ७०.३८

  • माकाजान ६३.४१

  • माजोर्डा ६६.५१

  • नागवा ७२.१९

  • नावेली ६२.५६

  • नुवे ७२.७७%

  • ओरली ७०.५७

  • पारोडा ७५.७२

  • राशोल ७०.४८

  • राय ६९.९०

  • रुमडामळ ७४.१४

  • सां जुझे द आरियाल ७२.१४

  • सारझोरा ६०.९८

  • तळावली ६४.०९

  • वार्का ७०.४२

  • वेळ्ळी ६५.९५

  • वेर्णा ७४.१७

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com