Prashanti Talpankar: गोव्याच्या 'प्रशांती'ची भरारी! IFFSA टोरंटो येथे ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, Video

Prashanti Talpankar Goa: पणजी येथील या लघुपटाच्या प्रदर्शनानंतर बोलताना प्रशांतीने या लघुपटाच्या प्रक्रियेसंबंधी बरेच काही सांगितले होते.
Prashanti Talpankar award
Prashanti Talpankar awardDainik Gomantak
Published on
Updated on

प्रशांती तळपणकर हिची कामगिरी उल्लेखनीय आहे. उत्तर अमेरिकेतील टोरंटो येथे आयोजित झालेल्या, १४व्या दक्षिण आशिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (IFFSA) लघुपट विभागात तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. मांगिरीश बांदोडकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आसेसांव' या 30 मिनिटाच्या लघुपटात प्रशांतीने मुख्य भूमिका अतिशय सुरेख सादर केली आहे.

टोरटो येथील या चित्रपट महोत्सवात हा लघुपट 14 ऑक्टोबर या दिवशी सादर झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटातील अभिनयासाठी पारितोषिक मिळवणारी प्रशांती तळपणकर ही कदाचित पहिली गोमंतकीय अभिनेत्री असावी.

या लघुपटाचे विशेष प्रदर्शन गेल्या महिन्यात पणजी येथील मॅकिनेझ पॅलेस या चित्रपटगृहात झाले होते. या प्रदर्शनाला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटाचे तसेच प्रशांती तळपणकर हिच्या अभिनयाचे कौतुक केले होते.

या चित्रपट महोत्सवात प्रशांतीला मिळालेला पुरस्कार हा त्या कौतुकावर उमटलेली मोहर आहे. हा पुरस्कार जाहीर करताना महोत्सव म्हणतो: 'आसेसांव लघुपटात वैयक्तिक संघर्ष आणि असुरक्षिततेला तोंड देणाऱ्या एका स्त्रीची भावनिक सखोलता आणि तिच्या जीवनातील गुंतागुंत प्रशांती तळपणकर हिने आपल्या विविधांगी अभिनयातून सादर केली आहे.‌

सामान्य वाटणाऱ्या पात्राचा एकाकीपणा, त्याच्या मनातील कुतुहल आणि त्याचे मानवी संबंध दर्शवताना तिने त्याला उंच स्तर प्रदान केला आहे. तपशिलांकडे बारकाईने लक्ष देत, व्यक्तिरेखेच्या अंतरंगाची सखोल समज बाणवून तळपणकर पडद्यावर अस्सलता आणि खोली आणतात आणि सूक्ष्म चित्रणातून प्रेक्षकांना मोहित करतात.'

पणजी येथील या लघुपटाच्या प्रदर्शनानंतर बोलताना प्रशांतीने या लघुपटाच्या प्रक्रियेसंबंधी बरेच काही सांगितले होते. स्वतःच्या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली होती की या लघुपटात काम करताना तिचा अनुभव वेगळा होता.

यापूर्वी तिला चित्रपटात अभिनय करताना दिग्दर्शकांच्या सूचनांनुसार काटेकोरपणे वागावे लागत असे.‌ मात्र आसेसांवच्या दिग्दर्शकांनी तिला बरेच वैयक्तिक स्वातंत्र्य दिले होते व तिच्या सूचनादेखील विचारात घेतल्या जात असत.

Prashanti Talpankar award
Filmfare Award: बॉलीवूडमध्ये गोव्याचा डंका! 'Article 370' साठी आदित्य जांभळे यांना फिल्मफेअर पुरस्कार

मांगिरीश बांदोडकर, दिग्दर्शक

या लघुपटात प्रशांती साकारत असलेले पात्र आम्ही प्रथम तयार केले आणि नंतर त्या भोवती कथा विणायला सुरुवात केली. प्रशांतीला नजरेसमोर ठेवूनच हे पात्र आम्ही विकसित करत होतो. कथा लेखनातील एक प्रकारे हा उलटा प्रयोग होता.

यापूर्वी प्रशांती तळपणकर हिची ‘जुझे’ या चित्रपटातील भूमिका आम्ही पाहिली होती. त्यात दक्षिण गोव्यातील एक विशिष्ट बोली ती सहज बोलत होती. या तिच्या  व्यक्तिरेखेवरून आम्ही पुढील प्रवास सुरू केला. 

Prashanti Talpankar award
Skoch Awards: अभिमान! गोव्‍याला 7 ‘स्कोच’ पुरस्‍कार जाहीर; अनुकरणीय कामगिरीबद्द्ल प्रोत्साहन

प्रशांतीसमोर आम्ही ही व्यक्तिरेखा ठेवली होती.‌ या चित्रपटाचे शूटिंग चालू असताना प्रशांती त्यात स्वतःची भर घालत असे.‌ 'अशा विशिष्ट प्रकारे केल्यास चालेल का?' वगैरे तिचे प्रश्न असत. त्यामुळे ही व्यक्तीरेखा केवळ आमची राहिली नव्हती तर तिचीही झाली होती.

ही व्यक्तिरेखा कशी असावी याचा अभ्यास करण्यासाठी मी आणि पटकथा लेखक एल्टन गावोगावी हिंडलो आहोत. तिच्या वयाचे लोक कसे चालतात, त्यांचे हावभाव कसे असतात, ते काय बोलतात, कसे बोलतात, त्यांच्या आपसातील संभाषण काय असते वगैरेंचे निरीक्षण आम्ही गोव्यातील अनेक छोट्या गावातील हॉटेलमध्ये फक्त ऐकत बसून केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com