Skoch Awards: अभिमान! गोव्‍याला 7 ‘स्कोच’ पुरस्‍कार जाहीर; अनुकरणीय कामगिरीबद्द्ल प्रोत्साहन

Skoch Awards Goa: राज्य सरकारने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या सुविधा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी ‘स्कोच’ समूहातर्फे सात पुरस्कार जाहीर झाले आहेत.
Goa government Skoch awards
Goa government Skoch awardsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्य सरकारने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या सुविधा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी ‘स्कोच’ समूहातर्फे सात पुरस्कार जाहीर झाले आहेत.

डिजिटलायजेशन, प्रशासन आणि वित्तीय सेवांसारख्या क्षेत्रांत अनुकरणीय कामगिरी, नवोन्मेष आणि शाश्वत पद्धतींद्वारे देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती, प्रकल्प आणि संस्थांना हे पुरस्कार दिले जातात.

Goa government Skoch awards
Gomantak Excellence Awards: संदीप नाडकर्णी यांचा ‘जीवन गौरव’ने सन्मान! ‘गोमन्तक’च्‍या पुरस्कारांचे 15 सप्‍टेंबरला वितरण

‘स्कोच’ समूहाने २००३ मध्ये स्थापन केलेल्या या पुरस्कार प्रक्रियेत ज्युरींतर्फे मूल्यांकन केले जाते आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

Goa government Skoch awards
National Film Awards Winners List: 71 व्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'ट्वेल्थ फेल' सर्वोत्तम चित्रपट, 'नाळ-2'चाही यथोचित सन्मान

वित्त खाते डाटा ॲनालेटिकल सेल (कोष डाटा मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म), गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ (कचरा व्यवस्थापन उपक्रम), क्रीडा आणि युवा व्यवहार खाते (खेलो गोवा केंद्र), महिला व बालकल्याण खाते (अंगणवाडीद्वारे बालपोषण सुधारणा), तंत्रशिक्षण संचालनालय (शाळांमध्ये कोडिंग ॲण्ड रोबॅटिक्स शिक्षणाचा समावेश), गोवा पोलिस खाते (घोटाळा आणि रॅडिकल कंटेंट विश्लेषक शोध), वजन-माप खाते (स्वयंसाहाय्‍य गटांसाठी पॅकर्स नोंदणी एफएसएसएआय परवाना शिबिर) यांना पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com