St Xavier's College : ‘म्हापसा झेवियर्स’च्‍या विद्यार्थी मंडळाचे उद्या अधिकारग्रहण

विद्यार्थ्यांना बजावलेली नोटीस मागे घेण्याची बचावपक्षाची मागणी
ABVP Member And ST Xavior Students
ABVP Member And ST Xavior StudentsDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa : येथील झेवियर्स कॉलेजच्या विद्यार्थी मंडळाचा बुधवारी (ता. 15) औपचारिक अधिकारग्रहण सोहळा होणार असून, यासंदर्भात कॉलेजतर्फे डायोसेशन सोसायटी ऑफ एज्युकेशनने म्हापसा न्यायालयासमोर लेखी आश्वासन दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी कोर्टाने 1 मार्चपर्यंत तहकूब केली.

दरम्यान, कॉलेज प्रशासनाने झेवियर्स कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांना बजावलेली कारणे दाखवा नोटीस मागे घ्यावी, अशी मागणी प्रतिवादींकडून वरील कोर्टासमोर करण्यात आली.

ABVP Member And ST Xavior Students
Panjim News : मद्यधुंद अवस्थेत पोहण्याचा मोह अंगलट, पणजी जिमखान्याच्या मागे एकाचा बुडून मृत्यू

यावर कॉलेज व्यवस्थापनाकडे चर्चा करून पुढील कृती कळविण्‍यात येईल, असे डायोसेशनच्‍या वकिलांनी कोर्टाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत (1 मार्च) हे प्रकरण तहकूब केले.

विद्यार्थी मंडळ स्थापनेसाठी 21 जानेवारी 2023 मध्ये म्हापसा सेंट झेवियर्स कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) सोबत कॉलेज आवारात धरणे आंदोलन केले होते.

या पार्श्वभूमीवर कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयात तोडफोड बंदी तर इतरांना कॉलेज परिसरात प्रवेश निषेध करावा, या मागणीसाठी डायोसेशन सोसायटी ऑफ एज्युकेशनतर्फे म्हापसा जीएमएफसी कोर्टात धाव घेत दिवाणी खटला दाखल केला होता.

ABVP Member And ST Xavior Students
Palolem Beach : गोव्यात प्रेमी प्रेमीयुगुलाचा मृत्यू, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशीच घडलेल्या घटनेने खळबळ

"बुधवारी (ता.15) रोजी विद्यार्थी मंडळाचा अधिकारग्रहण सोहळा होणार असल्‍याची माहिती झेवियर्स कॉलेजने कोर्टाला लेखी स्वरूपात दिली आहे. तर कॉलेज प्रशासनाने तीन विद्यार्थ्यांविरुद्ध 8 फेब्रुवारी रोजी शिस्तभंगाची कारणे दाखवा नोटीस बजावली होती."

"याकडे आम्ही कोर्टाचे लक्ष वेधले आणि सदर नोटीस कॉलेजला मागे घेण्यास लावावी, अशी विनंती आम्ही कोर्टाकडे केली आहे. पुढील सुनावणी १ मार्चला होईल."

- अ‍ॅड. प्रवीण फळदेसाई, प्रतिवादींचे वकील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com