Samuel Braganza Case: म्हापसा पालिकेच्या प्रशासकांवर गुन्हा दाखल करा! म्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणात 'टुगेदर फॉर म्हापसा' आक्रमक

together for mhapsa complaint samuel braganza suicide case: गावसावाडो-म्हापसा येथील २२ वर्षीय सॅम्युएल ब्रागांझा यांच्या मृत्यूप्रकरणी म्हापसा नगरपालिकेच्या प्रशासकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
together for mhapsa complaint samuel braganza suicide case
together for mhapsa Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गावसावाडो-म्हापसा येथील २२ वर्षीय सॅम्युएल ब्रागांझा यांच्या मृत्यूप्रकरणी म्हापसा नगरपालिकेच्या प्रशासकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ‘टुगेदर फॉर म्हापसा’ संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष ॲड. महेश राणे आणि सरचिटणीस जितेश कामत यांनी मंगळवारी म्हापसा (Mapusa) पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना यासंदर्भातील तक्रारपत्र सादर केले.

तक्रारपत्रात सॅम्युएलचा मृत्यू हा केवळ वैयक्तिक घटना नसून शहरातील कचरा व्यवस्थापनातील गंभीर अपयश आणि नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या पालिका प्रशासनाच्या घटनात्मक कर्तव्यातील दुर्लक्षाचा परिणाम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील कचऱ्याच्या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या, जनजागृती मोहिमा राबविल्या, तरीही प्रशासनाने कोणतीही प्रभावी किंवा सुधारात्मक पावले उचलली नाहीत, असे संघटनेचे म्हणणे आहे.

together for mhapsa complaint samuel braganza suicide case
Samuel Braganza Case: सॅम्युअल आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! तपासाभोवती संशयाचे दाट धुके, 'देशी कट्टा' आणि अडीच तासांचे गूढ; म्हापसा पोलिसांची कोंडी!

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरात अस्वच्छता वाढली असून सार्वजनिक उपद्रवाचे प्रमाणही वाढले आहे. याचा परिणाम म्हणून स्थानिक नागरिकांमध्ये मानसिक तणाव, वादविवाद, शिविगाळ आणि सामाजिक तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

संघटनेने ‘द गोवा नॉन-बायोडिग्रेडेबल गार्बेज (कंट्रोल) ॲक्ट, १९९६’च्या कलम ४ चे उल्लंघन आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पालिका प्रशासकांविरोधात तात्काळ एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. तसेच सॅम्युएलच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची सखोल चौकशी करावी, कचरा व्यवस्थापनाशी संबंधित सर्व रेकॉर्ड, जुन्या तक्रारी आणि तपास अहवाल जप्त करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

together for mhapsa complaint samuel braganza suicide case
Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

स्थानिक नागरिक, प्रत्यक्षदर्शी आणि पालिका अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून संपूर्ण प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, असे ॲड. महेश राणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू केवळ प्रशासकीय चूक म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. दोषींवर कडक उत्तरदायित्व निश्चित झाले पाहिजे, असा आक्रमक पवित्रा जितेश कामत यांनी घेतला. तसेच संबंधित व्हिडिओ चित्रित करून प्रसारित करणाऱ्या व्यक्तीवरही योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधितांचे फोन कॉल्स तपासा!

संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सॅम्युएलवर गुन्हा नोंद करावा यासाठी म्हापसा पोलिसांवर दबाव आणला गेला. तसेच, सॅम्युएलचा शवविच्छेदन अहवाल देण्यात आला, तो मागे घेण्यात यावा यासाठी संबंधित डॉक्टरांवरदेखील दबाव आणला गेला, असा धक्कादायक आरोप विजय भिके यांनी केला. त्यामुळे संबंधितांचे फोन कॉल्स तपासावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी सुदेश हसोटीकरदेखील उपस्थित होते.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com