Goa News: गोवा हिंदू युवा शक्ती तर्फे सार्वजनिकांना वाजवी दरात फळे व फुले उपलब्ध; वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

Today's Marathi Latest News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण,क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाची माहिती मराठीमध्ये
goa marathi important updates
goa marathi important updatesDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा हिंदू युवा शक्ती तर्फे सार्वजनिकांना वाजवी दरात फळे व फुले उपलब्ध

गोवा हिंदू युवा शक्ती तर्फे सार्वजनिकांना नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली फळे व फुले वाजवी दरात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. हे केंद्र गिरी, मापसा – बोडगेश्वर मंदिरासमोर, मापसा–ग्रीन पार्क मुख्य रस्त्यावर सुरु झाले आहे.

विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर उद्या सादर करतील राजीनामा

विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर उद्या सभापतीपदाचा राजीनामा सादर करतील आणि आमदार दिगंबर कामत यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतील; सभापती रमेश तवडकर यांनी केली पुष्टी

मुंगुल हल्ल्याचा खटला; आणखी एका आरोपीला अटक

फातोर्डा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा मंदार प्रभुगावकर या आणखी एका आरोपीला शस्त्रांसह अटक केली.

१०-१५ तरुणांच्या गटाकडून दोन भावांवर हल्ला

फातोर्डा येथील ओल्ड हॉस्पिसियो हॉस्पिटलजवळ सुमारे १०-१५ तरुणांच्या गटाने दोन भावांवर हल्ला केला. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वांते येथे 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान गणेश चतुर्थी बाजार

नवचैतन्य प्रगती मंच, वांते-सत्तरी आणि आदिवासी कल्याण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग आधार योजना अंतर्गत दिनांक 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत गणेश चतुर्थी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्षम मंत्री सुभाष फळदेसाईंसोबत खास संवाद...

कोकणी भाषा मंडळ आणि अखिल भारतीय कोकणी परिषद यांचा रोमी कोकणीला तीव्र विरोध

कोकणी भाषा मंडळ आणि अखिल भारतीय कोकणी परिषद यांचा रोमी कोकणीला तीव्र विरोध. शिक्षणात रोमी कोकणी लागू करण्याच्या हालचालींवर दोन्ही संघटनांचा आक्षेप. सरकारने असा प्रयत्न केल्यास गोवाव्यापी आंदोलन करण्याचा इशारा. आमदारांनी अशा विधेयकांना पाठिंबा न देण्याचे आवाहन

गोवा टॅक्सी संघटनांनी जुंता हाऊस येथे  केला मूक निषेध

मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री ओला, उबर आणि रॅपिडोवाल्यांना भेटले पण स्थानिक ऑपरेटर्सच्या तक्रारी ऐकून घेतल्या नाहीत असा आरोप करत उत्तर आणि दक्षिण गोवा टॅक्सी संघटनांनी जुंता हाऊस येथे मूक निषेध केला.

क्रीडामैदानाच्या बांधकामात घोटाळा नाहीच

क्रीडामैदानाच्या बांधकामात घोटाळा नाहीच. मंगळवारी पत्रकार परिषदेत मुळगाव पंचायतीचा दावा. विशेष ग्रामसभेत झालेल्या आरोपांचे खंडन. गेल्या महिन्यात झालेली ग्रामसभा क्रीडामैदानाच्या विषयावरुन तापली होती

वृद्ध महिलेच्या घराचे छप्पर कोसळण्याच्या मार्गावर; समाजसेवक शिवप्रसाद शिरोडकर करणार मदत

गवळवाडा - निरंकाल येथील सुमती वेळीप या वृद्ध महिलेच्या घराचे छप्पर कोसळण्याच्या मार्गावर आहे. यासंबधी गोमंतक टीव्हीने वृत्त प्रसारित केले होते. त्याची दखल शिरोडा येथील समाजसेवक शिवप्रसाद शिरोडकर यांनी दखल घेतली आहे. समाजसेवक शिवप्रसाद शिरोडकर यांनी घराच्या छपराची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

बोरी पुल खराब झाल्याने वाहतूक कोंडी

बोरी पुलावरील खराब झालेल्या भागामुळे वाहतुकीचा मोठा विस्कळीतपणा होतो. सुरक्षेच्या चिंता वाढत असल्याने प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागतो.

मारिया परेरा यांना नौदलाचा पुरस्कार

भारतीय वायुदलातील अधिकारी विंग कमांडर मारिया इस्मेनिया परेरा यांना नौदलाचा प्रतिष्ठेचा ‘मेन्शन इन डिस्पॅच’ हा शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्या मूळ गोव्यातील बेताळभाटी येथील असून भारतीय वायू दलात त्या ‘एई’ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान महत्त्वपूर्ण हवाई वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com