
पीओकेचे रहिवासी आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या वेगळे झालेले लोक एक दिवस भारतात परततील. पीओकेमधील बहुतेक लोकांचे भारताशी खोलवरचे नाते आहे; फक्त काही लोकांची दिशाभूल झाली आहे: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
फोंडा तालुक्यातील धोकादायक जंक्शनवर सिग्नल बसविण्याचा पहिला मान बेतोडा पंचायतीला जात आहे. सिग्नल बसविण्याचे काम पूर्ण. लवकरच सिग्नल सुरु करण्यात येईल. जंक्शनवर यापूर्वी घडले अनेक अपघात. बांधकाम खात्याच्या अभियंत्यातर्फे २०१९ साली सिग्नल बाविण्यासाठी प्रक्रिया केली होती. सिग्नल बसविण्याची किंवा उडाण पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थ गेल्या कित्येक वर्षां पासून करीत होते.
०१/०६/२०२५ रोजी वीज विभागाने दक्षिण गोव्यात नियोजित वीज बंद करणार असल्याने साळावली वॉटर वर्क्समधून पाणीपुरवठा मर्यादित होईल.
वाळपई पोलिसांनी सत्तरी येथे KL11AF7116 क्रमांकाच्या वाहनातून बेकायदेशीर दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. दारूच्या बाटल्या, 3 आरोपी आणि वाहन पुढील आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी वाळपई उत्पादन शुल्क निरीक्षकांकडे सुपूर्द केले आहेत.
गोवा राज्यात आज (गुरुवार) हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारी भागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मोले अभयारण्यातील वन कर्मचाऱ्यांना मारहाण करुन पळालेल्या चौघांना कुळे पोलिसांकडून अटक. या कारवाईत वन खात्याचे कर्मचारी, दुधसागर असोसिएशनचे सदस्य व स्थानिक लोकांनी सहकार्य केल्याची माहिती.
पणजीतील कॅसिनोमध्ये एका पर्यटकाने लाकडी दांडक्याने दोन सुरक्षा कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. यातील एक सुरक्षा कर्मचारी धीरू शर्मा (३३, रा. मध्य प्रदेश) याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. दुसरा सुरक्षा रक्षक सत्यम गावकर (२७, रा. शिरोडा) याला डोक्याला दुखापत झाली. हैदराबादमधील आरोपी अब्दुल अल्ताफ (२५, रा. हैदराबाद) याला पोलिसांनी अटक केली.
मोले अभयारण्यात बेकायदेशीर प्रवेश प्रकरणी वन कर्मचाऱ्यांनी जाब विचारल्यावर कर्नाटकातील चौघांकडून त्यांना मारहाण; दोन वन कर्मचारी जखमी, आरोपी फरार. पोलिसांत तक्रार दाखल, शोध सुरू.
मिरामारमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये एका सुरक्षा रक्षकाची एका पाहुण्याने हत्या केली. पणजी पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही घटना रात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
गेल्या तीन तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे कुडचडे मार्केटमध्ये पाणी साचले आहे, ज्यामुळे आंबेडकर चौक रोड, संतोषी माता मंदिराजवळील आणि कुडचडे-सावर्डे रेल्वे स्टेशन रोड यासारख्या भागात पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि परिणामी दुचाकी वाहने पूरग्रस्त भागात अडकली
ब्रम्हाकरमळी येथील श्री ब्रह्मदेव देवस्थानच्या फंड पेटी चोरी प्रकरणी विशाल उर्फ विश्वास गोविंद झर्मेकर (३८, नानोडा-सत्तरी) याला पोलिसांकडून बुधवारी रात्री उशिरा अटक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.