Goa News: आंबाडीच्या झाडाची भालिमोठी फांदी तुटून पडल्याने घराचे नुकसान; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Today's Marathi Breaking News:जाणून घ्या गोव्यातील ठळक आणि ताज्या घडामोडी मराठीमध्ये
Goa Rain
Goa RainDainik Gomantak
Published on
Updated on

आंबाडीच्या झाडाची भालिमोठी फांदी तुटून पडल्याने घराचे नुकसान

फोणचे भाट वळवई येथील प्रमोद नाईक यांच्या घरावर काल रात्री आंबाडीच्या झाडाची भालिमोठी फांदी तुटून पडल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले. या घटनेत प्रमोद नाईक व त्यांच्या पत्नी कौले तुटून पडल्याने जखमी झाले आहेत. सकाळी फोंडा अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन सदर फांदी हटवली. वळवई पंचायतीचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

मुसळधार पावसामुळे आंब्याचे झाड पार्क केलेल्या गाड्यांवर कोसळले

मुसळधार पावसामुळे कळंगुटमधील खोब्रावाडो येथे एक मोठे आंब्याचे झाड कोसळले, ज्यामुळे पार्क केलेल्या पाच गाड्यांचे नुकसान झाले. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेत सुमारे ७-८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

करमळीवाडो काकोडा येथे घरावर पडले निरफणसाचे झाड

करमळीवाडो काकोडा येथे घरावर निरफणसाचे झाड पडले, कुडचडे अग्निशमन केंद्राने किरकोळ नुकसान नोंदवले आहे.

साळगाव येथे ट्रक चिखलात अडकला

साळगाव येथे एक ट्रक चिखलात अडकला, जिथे नुकतेच इलेक्ट्रिक केबल्स टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता.

चिखलामुळे प्रवासी बस रस्त्याच्या कडेला अडकली

शिवनगर शेल्डे येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखलामुळे, एक प्रवासी बस रस्त्याच्या कडेला अडकली.

बांधकाम खात्याने शेतात पडलेली माती काढून देण्याची शेतकऱ्याची मागणी

केरये -खांडेपार येथील शेतात घुसलेल्या पाण्याच्या झोतात माती. रस्त्याचे रुंदीकरण करताना बांधकाम खात्याने शेतकऱ्यांसाठी खास माती घालून तयार करून दिला होता रस्ता. बांधकाम खात्याने शेतात पडलेली माती काढून देण्याची शेतकऱ्याची मागणी.

गेल्या १८ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात समस्या

गेल्या १८ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे केपे आणि सावर्डेच्या अनेक भागात समस्या निर्माण झाल्या आहेत. कुडचडे अग्निशमन केंद्राला ७ आपत्कालीन कॉल आले, ४ घरांवर झाडे पडल्याबद्दल आणि ३ झाडे रस्ते अडवल्याबद्दल होते. कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. गेल्या तीन दिवसांत एकूण १३ आपत्कालीन कॉल आले आहेत.

पुढील ३ तासांत वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

पुढील ३ तासांत उत्तर गोवा, दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे आणि वादळासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भाजी मार्केटजवळील काँक्रीटचा भाग कोसळला

म्हापसा येथील भाजी मार्केटजवळील बाल्कनीतील काँक्रीटचा एक भाग कोसळला.

लोटली येथे दुचाकी कोसळून भिंतीवर आदळल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

मंगळवारी रात्री लोटली येथे पावसामुळे कोसळलेल्या संरक्षक भिंतीला दुचाकीची धडक बसल्याने ऑगस्टिन क्वाड्रोस या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मायना-कुडतरी पोलिसांनी या घटनेचा अनैसर्गिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

केरये खांडेपारचा नवा सर्विस रोड मान्सून पूर्व पावसातच खचला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com