
गोवा सरकारी आयोगाच्या नोकर भरती परीक्षेत मराठी भाषेला स्थान द्यावे आणि सरकारी कार्यालयातील फलक मराठीतून करावे यासाठी आज सत्तरी तालुक्यातील मराठी प्रीमिंचे राज्य भाषा संचालनलयाचे संचालक प्रशांत शिरोडकर यांना पणजीतील कार्यालयात निवेदन दिले.
फोंडा वाहतूक पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्कश आवाजात दुचाकी घेऊन फिरणाऱ्यां विरूध्द वाहतूक पोलिसांनी केली कारवाई. तीन दुचाकी मालंकावर गुन्हा दाखल.
सीसीए पणजी रुग्णवाहिका पथकाने अलीकडेच समर्पण दाखवून १.३ वर्षाच्या चिमुकलीला हृदयविकाराच्या झटक्यांपासून वाचवले. ईएमटी-ए सुश्री वैभवी वेरेंकर आणि पायलट अब्दुल शेख यांनी इंट्यूबेशन आणि व्हेंटिलेटर सपोर्ट प्रदान केला, ज्यामुळे बाळाला जीएमसीमध्ये सुरक्षितपणे नेण्यात आले: विश्वजित राणे, आरोग्य मंत्री
घुरीये मधील ग्रीन पार्कजवळ एक अपघात झाला. जिथे एक कार रस्त्याने घसरून नारळाच्या झाडावर आदळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तदाब अचानक वाढल्याने चालक, ज्येष्ठ नागरिक यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
माजी मुख्यमंत्री तथा आपच्या दिल्लीच्या आमदार आतिषी यांनी दिलेल्या 'एकला चलो' च्या नाऱ्यामुळे गोमंतकीय जनतेने भाजपची 'बी' टीम कोण हे ओळखावे आणि आगामी निवडणुकांत कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा हे ठरवावे, रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब यांनी प्रतिक्रिया दिली.
पारोडा येथे अर्ध्या तासापूर्वी साळावली पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटली, सालसेट पाणीपुरवठा ठप्प.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलसह गोव्यात गैर-संसर्गजन्य रोगांवर (एनसीडी) लॉन्जिट्यूडिनल कोहार्ट अभ्यास सुरू केला. अभ्यासाचे प्रमुख परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम, धोरण विकास, लक्ष्यित आरोग्यसेवा धोरणे विकसित करण्यासाठी गोव्याच्या आहार, पर्यावरण आणि अनुवांशिक घटकांवर आधारित असतील.
साखळी नगरपालिका क्षेत्रातील विविध भागात कचरा फेकणाऱ्यांवर आता नगरपालिका सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवणार. सर्व बाराही प्रभागांसाठी बारा सीसीटीव्ही कॅमेरे नगरपालिकेने घेऊन प्रत्येक नगरसेवकाला एक प्रमाणे दिले आहेत. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील ब्लॅक स्पॉटवर हे कॅमेरे लावले असून त्या त्या ठिकाणी कचरा फेकण्याचे प्रकार कमी झाले आहेत. सदर कॅमेरे मुव्हेबल पध्दतीचे असल्याने ते इतरही ठिकाणी हलविणे सोपे आहे. से नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांनी सांगितले.
सरकारी प्राथमिक शाळा वाळपई येथे बाजारदिन. आज मंडळवारी उत्साहात संपन्न. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष रामदास शिरोडकर, भालचंद्र भावे, बाबनी कुडतरकर, प्रकाश गावकर, दत्ताराम मयेकर आणि इतरांची उपस्थिती.
जुने गोवे पोलिसांकडून करमाळी स्टेशन आणि जुने गोवे परिसरात ५१२ भाडेकरूंची पडताळणी. पाच जणांना अटक, चौकशीसाठी पाचजणं ताब्यात.
उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी थिवी अवचितवाडा येथील ‘लाला की बस्ती’मधील बेकायदेशीर घरे रिकामी करण्यासाठी ११ मार्च २०२५ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. अंतिम मुदतीनंतर कोणत्याही दिवशी घरं पडण्यास सुरुवात होऊ शकते. २५ बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.