Goa News: पर्रा खून प्रकरण, आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Today's Marathi Breaking News 09 July 2025: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर
Goa News: पर्रा खून प्रकरण, आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी
Crime|ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

देशव्यापी बंदला डिचोलीत संमिश्र प्रतिसाद

देशव्यापी बंदला डिचोलीत संमिश्र प्रतिसाद. बँका बंद, उद्योग प्रकल्प मात्र सुरु. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी पुकारला होता बंद

कळसा भंडुरा प्रकल्पाला विरोध करण्याचा गोवा सरकारला अधिकार नाही!

३ महत्वाच्या पाणी प्रकल्पांसाठी कर्नाटकचे जलस्त्रोत मंत्री डी.के.शिवकुमार यांनी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव व जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची नवी दिल्लीत घेतली भेट. कळसा भंडुरा प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली आहे. गोवा सरकारला प्रकल्पाला विरोध करण्याचा कोणताही अधिकार नाही.कळसा भंडुरा मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींशीही कायदेशीर उपायांवर चर्चा करणार. डी.के.शिवकुमार यांचे प्रतिपादन

?” तर काहींनी लिहिलं – “प्रेग्नंट वाटतेय.”

भारत सरकारच्या नियमांनुसार, एक चाचणी जरी पॉझिटिव्ह आली तरी त्या विषाणूमुळे प्राणीसंग्रहालय उघडता येत नाही. पण आता सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत त्यामुळे बोंडला वन्यजीव अभयारण्य पूर्णपणे खुले आहे. आमच्याकडे काही नवीन योजना देखील आहेत, ज्यांची योग्य वेळी चर्चा केली जाईल: मंत्री विश्वजीत राणे.

"संजीवनी साखर कारखान्याच्या जागेत ट्रक टर्मिनल उभारल्यास उपयुक्त" आमदार विजय सरदेसाई

संजीवनी साखर कारखान्याच्या जागेत आयआयटी ऐवजी अत्यंत गरज असलेला ट्रक टर्मिनल उभारल्यास उपयुक्त ठरेल. त्यासाठी सरकारने स्थानिकाना व ऊस उत्पादकांना विश्वासात घेण्याची गरज - आमदार विजय सरदेसाई

Parra Murder Case: पर्रा खून प्रकरण, आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

म्हापसा न्यायालयाने स्थलांतरित कामगाराचा खून केल्याप्रकरणी आरोपी सत्या नबरंगपूरा आणि त्याचा मुलगा थबीर नबरंगपूरा यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

मंत्रिमंडळाकडून अंतर्गत जलमार्ग विभागाच्या निर्मितीला मान्यता

मंत्रिमंडळाने अंतर्गत जलमार्ग विभागाच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. पूर्वी, नदी जलवाहतूक विभाग बंदरांच्या कॅप्टनच्या अंतर्गत काम करत होता. या बदलामुळे, नदी जलवाहतूक विभाग आता अस्तित्वात राहणार नाही.

राज्यात १९४८ चे कारखाना गोवा सुधारणा विधेयक लागू करण्यात आले

राज्यात १९४८ चे कारखाना गोवा सुधारणा विधेयक लागू करण्यात आले, व्यवसाय सुलभतेसाठी दुरुस्ती खरेदी केली: मुख्यमंत्री

आझाद मैदानात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

ऑल इंडिया अंगणवाडी फेडरेशनच्या अंतर्गत हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जमून प्रमुख कामगार मागण्या मांडल्या. त्यांनी कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, किमान वेतन २६,००० करावे, नोकरी नियमित करावी, खाजगीकरण थांबवावे आणि ७ वे वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी केली.

धिरियो विरोधात सतर्क राहण्यासाठी समिती स्थापन करणार

धिरियो (बैलांच्या झुंजी) विरोधात सतर्क राहण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी मामलतदार, पोलिस अधिकारी (प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी), पशुवैद्यकीय अधिकारी आणि बैल हाताळणारे यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे.

उसगाव पंचायत व फोंडा पोलिसांनी परिसरात धोका दर्शविणारे फलक

गांजे येथील म्हादई नदीवर अंघोळीसाठी जाणाऱ्या लोकांचा बुडून मृत्यू होत असल्याची दखल घेऊन उसगाव पंचायत व फोंडा पोलिसांनी परिसरात धोका दर्शविणारे फलक लावले आहे. ४ महिन्यात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटना रोखण्यासाठी आवश्यक उपाय काढण्यात आला आहे. धोका दर्शविणारे फलक लावल्याने स्थानिक लोकांनी आभार व्यक्त केले आहे.

श्रवण बर्वे खून प्रकरण, भाऊ उदय बर्वे याला जामीन मंजूर

सत्तरी नगरगांव येथील श्रवण बर्वे खून प्रकरणात अटकेत असलेल्या उदय बर्वे (श्रवणचा भाऊ) याला २५ हजारांच्या वैयक्तीक हमीवर जामीन मंजूर. उदय बर्वे ह्याला जामीन‌ मंजूर करताना, फक्त या प्रकरणातील सहआरोपी वासुदेव ओझरेकरच्या कबुली‌ जबाबावरुन उदयला अटक करण्यात आल्याचे निरीक्षण उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने नोंदवले आहे

संविधान बचाव अभियान..!

काँग्रेसतर्फे डिचोलीत 'संविधान बचाव अभियान'कार्यक्रम.शनिवारी 12 जुलै रोजी आयोजित कार्यक्रमास माणिकराव ठाकरे, अंजली निंबाळकर यांच्यासह स्थानिक नेते राहणार उपस्थित

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com