
धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या जागेत सरकार वादग्रस्त ठरत असलेला आयआयटी प्रकल्प उभारण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सरकार गुप्तपणे लोकांना विश्वासात न घेता प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कामगार वर्ग व ऊस उत्पादक मध्ये नाराजीचे सावट पसरले आहे. ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सरकारने कारखाना सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. आयआयटी कधीच चर्चा झालेली नाही. सरकारने येत्या १५ दिवसात संजीवनी कारखान्याबद्दल धोरण स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच लवकरच ऊस उत्पादकांची बैठक बोलवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या भेटीची माहिती शेअर केली. "गोव्यातील औद्योगिक पायाभूत सुविधा आणखी वाढवण्यावर आणि निर्यात सुलभीकरण मजबूत करण्यावर विचारांची देवाणघेवाण झाली. आम्ही कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांवर देखील चर्चा केली, ज्यात सेंद्रिय निर्यातीला चालना देणे आणि नवीन निर्यातदारांसाठी संधींचा विस्तार करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे."
मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या खात्याशी संबंधित चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. ते केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल आणि अमित शहा यांची भेट घेतील. दिल्ली नेतृत्वासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक ही पक्षाच्या अंतर्गत चर्चेचा भाग आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे देखील त्यांच्या खात्याच्या कामावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत:भाजप अध्यक्ष दामू नाईक
बेतकी - खांडोळा पंचायतीच्या उपसरपंच संजीवनी तळेकर यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव ५ विरुद्ध ० मतांनी झाला संमत
धारगळ पेडणे येथे एका १७ वर्षीय मुलावर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याचा गोवा प्रदेश महिला काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा हल्ला केवळ अमानवी कृत्य नसून, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पूर्णपणे कोलमडलेल्या परिस्थितीचे भयावह चित्र असल्याची टीका महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांनी केली आहे.
धारगळ येथे अॅसिड हल्ल्यात ऋषभ शेट्ये एका बाजूने भाजला होता. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मी त्यांच्या कुटुंबियांना भेटलो आणि आमच्या संभाषणावरून असे दिसून आले की हा हल्ला प्रेमप्रकरणाशी असू शकतो: आमदार प्रवीण आर्लेकर
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे दोघेही दिल्लीत. मंत्रीमंडळ फेररचनेच्या चर्चा सुरू असताना दोघांनीही दिल्ली गाठल्याने चर्चांना वेग
नवे वाडा भाटपाल काणकोण येथील सहावी इयत्ता शिकणारा सोमेश गावंडर या विद्यार्थ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयकारक घटना शनिवारी संध्याकाळी घडली शनिवारी संध्याकाळी आपल्या खोलीत मोबाईल चार्जिंगला लावत असताना ही घटना घडली
अल्पवयीन मुलावर अॅसिड हल्ल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना कधीही घडू नयेत. आम्ही पोलिसांना आज संध्याकाळपर्यंत हल्लेखोराला कोणत्याही परिस्थितीत पकडण्याचे निर्देश दिले आहेत. हल्लेखोर कुठेही असला तरी त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे: आमदार प्रवीण आर्लेकर
वाडी- तळावली येथील डॉ. पी. एस. रमाणी मैदानाजवळ असलेल्या शेतात भात शेती लागवड करण्यात सुरुवात. परिसरात मोठ्या प्रमाणात दगड असून सुद्धा तळीच्या पाण्यातून भात शेती लागवड करण्याची परंपरा रघु नाईक यांनी सुरु ठेवली आहे. दगडाच्या माथ्यावर भात शेती करण्याचे एक चांगले उदाहरण रघु नाईक यांनी भावी शेतकऱ्यासाठी घालून दिले आहे
काणकोण, भाटपाल येथील ११ वर्षांच्या मुलाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासानुसार, ही घटना त्याच्या खोलीत एका एक्सटेंशन बोर्डजवळ मच्छरदाणी वापरत असताना घडली, तेव्हा तो चुकून विजेच्या संपर्कात आला आणि त्याला प्राणघातक धक्का बसला.
ऋषभ उमेश शेट्ये (१७) रा. धारगलीम-पेरणेमवर स्कूटरवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने अॅसिड हल्ला केल्याचा आरोप आहे; ऋषभ शाळेत जात असताना ही घटना घडली; ऋषभला जीएमसीमध्ये दाखल केले; हल्ल्यामागील कारण कळले नाही.
२१ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत रविवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.