21 एप्रिल दिनविशेष: जाणून घ्या इतिहासात आज काय घडले

इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा
Today in history
Today in history Dainik Gomantak

1926: इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचा जन्म

एलिझाबेथचा जन्म 21 एप्रिल, इ.स. 1926 रोजी लंडन येथे झाला.

1938: पाकिस्तानी कवी मुहम्मद इक्‍बाल यांचे निधन

मुहम्मद इक्बाल मसूदी हे अविभाजित भारतातील प्रसिद्ध कवी, नेते आणि तत्त्वज्ञ होते. मुहम्मद इक्बाल मसूदी यांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी "तराना-ए-हिंद" लिहिले, ज्याचे सुरुवातीचे शब्द - "सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा" असे होते.

भारतीय नागरी सेवा दिन

21 एप्रिल 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते.

Today in history
"...तर गोव्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता"

1950: हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म

21 एप्रिल 1950 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. छोट्या पडद्यावरील गाजलेल्या ‘सीआयडी’या प्रसिद्ध मालिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.

1997: भारताचे 11 वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी

इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म पंजाब प्रांतातील झेलम या शहरात झाला.

2005: 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कारासाठी आमटेंची निवड

महाराष्ट्र शासनाच्या 2004च्या 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कारासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची निवड झाली.

2013: भारतीय महिला गणितज्ञ शकुंतलादेवी यांचे निधन

वयाच्या 6 व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com