Mahadayi Water Dispute: म्हादई वाचवण्यासाठी घराबाहेर पडून आंदोलनाचे समर्थन करावे

नार्वेकर : व्याघ्र अभयारण्यासाठी जनजागृती; पंचायतींनाही आवाहन
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute मोपा विमानतळाच्या माध्यमातून गोव्याची विक्री केल्याचा आरोप करीत सदर विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर पेडणे तालुक्यासह बार्देशात पाणी-बाणी निर्माण होईल.

त्यामुळे भविष्यातील ही भीषणता टाळण्यासाठी लोकांनी म्हादई वाचवण्यासाठी घराबाहेर पडून आंदोलनाचे समर्थन करावे.

त्याचप्रमाणे म्हादई वळवण्याच्या प्रयत्नांना पोटतिडकीने विरोध करण्याची गरज असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. दयानंद नार्वेकर यांनी व्यक्त केले.

Mahadayi Water Dispute
Valpoi Campaign : पर्यावरण रक्षणासाठी ब्रह्माकरमळीत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण उपक्रम

‘वाघ वाचवा म्हादई वाचवा’ ही मागणी करीत तसेच म्हादई व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यासाठी म्हादाईप्रेमींनी बुधवारी म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर देवाला गाऱ्हाणे घालून बार्देश तालुक्यातील आंदोलनास सुरवात केली.

बार्देशातील 33 पंचायतींना भेट देऊन संबंधितांना निवेदन सादर केले जाईल. त्याचप्रमाणे, सर्व पंचायतींनी म्हादईचे पाणी वळवण्यास विरोध करणारा एकमुखी ठराव मंजूर करावा अशी मागणी या निवेदनातून केली जाणार आहे.

यावेळी अ‍ॅड. सुभाष नार्वेकर, पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर, राहुल म्हांबरे, नगरसेवक अ‍ॅड. शशांक नार्वेकर, राजेंद्र घाटे, सुधीर कांदोळकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com