Denmark Goa Charter Flight: डेन्मार्क-गोवा चार्टर विमाने पुन्हा सुरू करणार; राजदुतांची ग्वाही

कोरोनाकाळापासून बंद झाली चार्टर विमाने, राजदूत फ्रेडी स्वान करणार पाठपुरावा
Denmark Goa Charter Flight
Denmark Goa Charter FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Denmark Goa Charter Flight: डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वॅन हे गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, स्वान यांनी डेन्मार्क-गोवा चार्टर विमाने पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. कोरोना महारोगराईकाळात ही चार्टर विमाने बंद झाली होती.

तथापि, आता ही चार्टर विमाने पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्या देशाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ओल्ड गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम चर्चला देखील त्यांनी भेट दिली. ते म्हणाले की, मला गोव्यात पर्यटनाची प्रचंड क्षमता दिसत आहे. मी परत जाईन आणि चार्टर विमानसेवा पुन्हा सुरू करू शकतो का हे पाहण्याचा प्रयत्न करीन.

Denmark Goa Charter Flight
Goa Surf Festival 2023: समुद्राच्या लाटांवरील थरारासाठी व्हा सज्ज; गोव्यात होणार पहिला 'सर्फ फेस्टिव्हल'

ते म्हणाले की, डेन्मार्कचे पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात भेट देत असतात. कोविड महामारीच्या वेळी डेन्मार्क आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी काम करत होते तेव्हा असे आढळले की त्यांचे बहुसंख्य नागरिक गोव्यात होते.

स्वान यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. गोवा विधानसभा संकुलात सभापती रमेश तवडकर आणि जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी बॅसिलिका ऑफ बॉम चर्चलाही भेट दिली.

स्वान म्हणाले की, कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी डेन्मार्कमधून चार्टर फ्लाईट्स गोव्यात येत होत्या. परंतु महारोगराईच्या काळात त्या बंद करण्यात आल्या होत्या. गोव्यात पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे. मी चार्टर फ्लाईट पुन्हा रूळावर आणण्यासाठी प्रयत्न करेन

Denmark Goa Charter Flight
Luizinho Faleiro: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला गोवा महाराष्ट्रात विलिन करायचा होता; लुईझिन फालेरो यांचे वक्तव्य

कोरोनाकाळात डेन्मार्क भारतातून त्यांचे नागरीक परत नेण्यासाठी काम करत होता. त्यावेळी डेन्मार्कचे बहुतांश नागरीक डेन्मार्कमध्ये होते. गोव्यात अनेक डॅनिश कंपन्या कार्यरत आहेत. आणखी एक कंपनी गोव्यात लवकरच मोठी गुंतवणूक करणार आहे.

डेन्मार्कला गोव्यासोबत काम करायला आवडेल. आम्ही तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान आणि इतर राज्यांसोबत काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com