पुढील 10 वर्षात 'हर घर फायबर' अंतर्गत घराघरात 5G इंटरनेट सेवा पुरवणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या प्रयत्नातून पर्ये मतदारसंघात 100 कोटी रुपयांची विविध विकासकामे होणार आहेत. त्याचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
5G Internet Connectivity in Goa | CM Dr. Pramod Sawant
5G Internet Connectivity in Goa | CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

5G Internet Connectivity in Goa: 'हर घर जल' योजनेंतर्गत सरकारने घरोघरी पाण्याचे कनेक्शन दिले, त्याचप्रमाणे आता 'हर घर फायबर' अंतर्गत राज्यातील प्रत्येक घरी 5G इंटरनेट सेवा देण्यासाठी सरकार सज्ज असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या प्रयत्नातून पर्ये मतदारसंघात 100 कोटी रुपयांची विविध विकासकामे होणार आहेत. त्याचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

5G Internet Connectivity in Goa | CM Dr. Pramod Sawant
CM Pramod Sawant: 'या' गोष्टींमुळेच बनतेय राज्याची ‘मॉडर्न गोवा’ म्हणून नवी ओळख

मुख्यमंत्री म्हणाले की, रस्ते, वीज आणि पाणी या सोयींसोबतच आता आयटी सेवेच्या माध्यमातून गाव आणि शहरांना जोडण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

सरकार हर घर जल योजनेप्रमाणेच 'हर घर फायबर' अंतर्गत प्रत्येकाला 5G इंटरनेट सेवा पुरवण्याच्या तयारीत आहे. पुढील 10 वर्षात राज्यातील प्रत्येक घरात 5G कनेक्टीव्हिटी असणार आहे.

मोर्ले काॅलनी येथील समाज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार डाॅ. दिव्या राणे तसेच पंच, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, अभियंते, विविध खात्यातील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com