Tivrem Vargao: 2 गटांत रंगली चुरस! तिवरे–वरगावात सत्तासंघर्षाचा विस्फोट; सरपंच–उपसरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर

Tivrem Vargao Panchayat: सरपंच जयेश नाईक आणि उपसरपंच एकनाथ परब यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव विशेष बैठकीत ५–० मतांनी संमत करण्यात आला. सरपंच व उपसरपंच गैरहजर होते.
Court Order, summons
Court Order, summons Canva
Published on
Updated on

खांडोळा: तिवरे–वरगाव ग्रामपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या राजकीय तणावाचा कळस झाला. सरपंच जयेश नाईक आणि उपसरपंच एकनाथ परब यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव विशेष बैठकीत ५–० मतांनी संमत करण्यात आला. सरपंच व उपसरपंच गैरहजर होते.

अविश्वास ठरावाची कारवाई पार पडण्यासाठी बीडीओ कार्यालयाचे निरीक्षक हेमंत गवस व सचिव गोकुळदास कुडाळकर यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत सभागृहात सकाळपासूनच वातावरण तणावपूर्ण असले तरी बैठक सुरळीत पार पडली.

पंच फ्रान्सिस लोबो, अपर्णा आमोणकर, सुमित्रा नाईक, शिल्पा वेरेकर व सिद्धार्थ गाड उपस्थित होते तर सरपंच जयेश नाईक, उपसरपंच एकनाथ परब, संजीव कुंईकर, यशवंत जल्मी गैरहजर होते. पाच सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. दरम्यान, नवीन सरपंच आणि उपसरपंच निवडण्यासाठी पुढील काही दिवसांत विशेष बैठक होण्याची शक्यता आहे.

Court Order, summons
Goa Zilla Panchayat Election: जिल्‍हा पंचायत निवडणुकीत 80% नव्‍या चेहऱ्यांना संधी! दामू नाईक यांची माहिती; Watch Video

मात्र दोन्ही गटांत चुरस निर्माण झाल्याने कोणाची सरशी होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, अविश्वास ठराव मंजूर झाल्याने प्रियोळ मतदारसंघातील स्थानिक राजकारणावर व्यापक परिणाम उमटतील, अशी चर्चा सध्या रंगली आहे. आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत या घडामोडींचा थेट परिणाम जाणवेल.

Court Order, summons
Curti Khandepar Panchayat: कुर्टी-खांडेपार नूतन पंचायतघराला 'रवीं'चे नाव! ग्रामसभेत ठराव एकमताने संमत

‘गोमन्तक’चे भाकित अचूक

काही दिवसांपूर्वी ‘गोमन्तक’ने तिवरे–वरगाव पंचायत अविश्वास ठराव उंबरठ्यावर असल्याचे वृत्त दिले होते. बेतकी–खांडोळा आणि भोम पंचायतीत झालेल्या सत्ताबदलानंतर तिवरे–वरगावमध्येही बदलाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आजचा निकाल तसाच लागल्याने हे अंदाज अचूक ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com