
पणजी: गोव्यातील हॉस्पिटॅलिटी आणि नाईटलाइफ ब्रँडची प्रमुख कंपनी टिटोज रिसॉर्ट्स अँड हॉस्पिटॅलिटीज, लवकरच एसएमई आयपीओ घेऊन येण्याच्या तयारीत आहे. कंपनीने 1,000 कोटी रुपयांपर्यंतचे मूल्यांकनाचे लक्ष ठेवले आहे.
NDTV प्रॉफिटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गोव्याच्या बागा येथील आयकॉनिक टिटोच्या नाईट क्लब आणि कॅफे मॅम्बोसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने या ऑफरद्वारे किमान 30 टक्के इक्विटी कमी करण्याची योजना आहे. IPO मध्ये नव्याने शेअर्स इश्यू होण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजला यासाठी बँकर्स म्हणून पसंती देण्यात आल्याची माहिती मिळतेय.
नाईट क्लब गोवा-आधारित भारतीय अब्जाधीशांसोबत प्री-आयपीओ इक्विटी वाटपासाठी बोलणी करत आहे. यामुळे आयपीओ लिस्ट होण्यापूर्वी अतिरिक्त मूल्य अनलॉक करण्यात मदत होईल, अशी माहिती समोर आली आहे. सध्या ही प्रक्रिया प्राथमिक स्थितीत असून, प्रक्रिया पुढे गेल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
टिटोज ब्रँड निर्माण करणाऱ्या बंधू रिचर्ड आणि डेव्हिड डिसोझा आयपीओचे मूल्य ठरवण्यासाठी रणनीती तयार आहेत. यामुळे आयपीओ येण्यास होण्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये डिसोझा बंधुंनी टीटोजचे ६५ टक्के स्टेक गुंतवणुकदारांना विक्री केले होते. पण, अद्याप डिझोसा यांच्याकडेच कंपनीचे पूर्ण नियंत्रण आहे.
टीटोज गोव्यात मद्यविक्रीतील एक प्रमुख नाव आहे. नुवामाचा सप्टेंबर २०२४ च्या अहवालानुसार, शहरी भागात नाईटलाईफचे फॅड जोरात वाढताना दिसत आहे. तसेच, नाईटलाईफचा आनंद घेण्यासाठी तरुणाई अधिक पसंती देत असल्याचे हा अहवाल सांगतो. त्यामुळे हॉस्पिटॅलिटी विश्वात या आयपीओचे जोरदार स्वागत होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.