Arambol Murder: खून झाला 'त्या' शॅकचा परवाना रद्द, 25 लाखांचा ठोठावला दंड; सात दिवसांत शॅक मोडण्याचे आदेश
Goa Tourism Cancel Shack LicenseDainik Gomantak

Arambol Murder: खून झाला 'त्या' शॅकचा परवाना रद्द, 25 लाखांचा ठोठावला दंड; सात दिवसांत शॅक मोडण्याचे आदेश

Arambol Murder Case: गोवा पर्यटन खात्याने फर्नांडिस यांच्यावर शॅक अर्जासाठी आजीवन बंदी घातली आहे.
Published on

मांद्रे: हरमल समुद्रकिनारी स्थानिक युवकाला शॅक कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आता राज्य सरकारने ज्या शॅकवर खून झाला त्या शॅक मालकाविरोधात सक्त कारवाई करुन त्याचा परवाना रद्द केला आहे. तसेच, २५ लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.

गोवा पर्यटन खात्याने मॅन्युएल इस्प्रितो फर्नांडिस यांचा शॅक परवाना रद्द केला आहे. शॅक दुसऱ्याला भाड्याने देणे हे गोवा राज्य शॅक धोरण कलम २० चे उल्लंघन असल्याने ही कारवाई करण्यात आलीय. फर्नांडिस यांचा शॅक परवाना रद्द करण्यासह त्यांना २५ लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. तसेच, त्यांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली असून भविष्यात त्यांना शॅकसाठी अर्ज करता येणार नाही.

Arambol Murder: खून झाला 'त्या' शॅकचा परवाना रद्द, 25 लाखांचा ठोठावला दंड; सात दिवसांत शॅक मोडण्याचे आदेश
Arambol Murder Case: हरमल खून प्रकरणात नवा ट्विस्ट; Postmortem रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, संभ्रम वाढला

गोवा पर्यटन खात्याने फर्नांडिस यांच्यावर शॅक अर्जासाठी आजीवन बंदी घातली आहे. फर्नांडिस यांना पुढील सात दिवसात शॅक मोडण्याचे आदेश दिले असून, तसे न केल्यास पर्यटन विभाग शॅक हटवण्याचे काम करेल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. समुद्रकिनाऱ्यावर अडथळा ठरणाऱ्या खुर्च्या हटवल्या म्हणून स्थानिक युवक अमर बांदेकर याला शॅक कर्मचाऱ्यांकडून जीवे मारण्यात आले. याप्रकरणी शॅकवर कारवाईची मागणी केली जात होती.

Arambol Murder: खून झाला 'त्या' शॅकचा परवाना रद्द, 25 लाखांचा ठोठावला दंड; सात दिवसांत शॅक मोडण्याचे आदेश
South Goa SP: बजरंग दलाची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले अन् एका वायरलेस मेसेजवरुन एसपींची झाली बदली

अखेर गोवा पर्यटन खात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, शॅकचा परवाना रद्द करण्यासह २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. खूनाच्या या घटनेमुळे स्थानिक चांगलेच आक्रमक झाले होते. तसेच, स्थानिक देखील राज्यात सुरक्षित नसल्याचे म्हणत त्यांनी कारवाईची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com