Tiswadi News : गोमेकॉ संकुलात पाणीच पाणी! प्रशासनाचे दुर्लक्ष

Tiswadi News : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या रस्त्यावर पाणी साचल्याने रुग्णांना, तसेच गोमेकॉच्या कर्माचाऱ्यांना त्या मार्गी जाणे त्रासदायक ठरले. पाण्यातून दुचाकी आणि चारचाकी जाणेदेखील अवघड होत असल्याने चालून जाणेही शक्य नव्हते.
Tiswadi
Tiswadi Dainik Gomantak
Published on
Updated on

Tiswadi News :

तिसवाडी, राज्यात पावसाने धडाक्यात सुरवात केली असून पहिल्या आठवड्यात संततधार झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु अवघ्या काही तासांच्या पावसातच गोमेकॉ संकुलात पाणी साचून तेथे ‘तळ्याचे स्वरूप’ आल्याने रुग्णांची आणि इतरांची गैरसोय झाली.

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या रस्त्यावर पाणी साचल्याने रुग्णांना, तसेच गोमेकॉच्या कर्माचाऱ्यांना त्या मार्गी जाणे त्रासदायक ठरले. पाण्यातून दुचाकी आणि चारचाकी जाणेदेखील अवघड होत असल्याने चालून जाणेही शक्य नव्हते. खासकरून ज्येष्ठ नागरिकांना याचा प्रचंड त्रास झाला.

पाणी साचण्याचे प्रकार पूर्वीदेखील होत असल्याने गोमेकॉ प्रशासन याची दखल नाही, असे दिसून येते. दरवर्षी याच ठिकाणी पाणी साचण्याचा प्रकार घडत असतात.

Tiswadi
Goa Todays Update: धक्कादायक! म्हापसात 21 वर्षीय प्रियेसीवर प्राणघातक हल्ला करुन प्रियकर फरार

पावसाचे पाणी जाण्यासाठी बांधलेल्या गटारांची साफसफाई न झाल्याने अशी परिस्थिती निर्माण होते. गटारांचा आराखडा हा परिसराच्या पावसाशी संबंधित असावा. कंत्राटदार, सल्लागार आणि सरकारी यंत्रणा या सर्वच मागण्यांबाबत गाफील होत्या, असे दिसते.

- मिलिंद प्रभू, तज्ज्ञ

गोमेकॉत येणाऱ्या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी आरोग्यमंत्री आणि डीन यांनी या पाणी साचण्याकडे तातडीने लक्ष द्यावे.

- ॲड. अमित पालेकर, प्रदेशाध्यक्ष, ‘आप’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com