म्हापसामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हापसातील ग्रीन पार्क रोडवर वास्को येथील मुलीवर हल्ला करुन तिचा प्रियकर पळून गेला. सध्या त्याचा तपास सुरु आहे.
पावसाळी विधानसभा अधिवेशन 15 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यासंबंधीची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली. अधिवेशनात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न मांडण्याची आणि सोडवण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन यावेळी तवडकरांनी केले.
फोंडा नगरपालिका क्षेत्रात अनेक वर्षे एकाच ठिकाणा पार्क करुन ठेवण्यात आलेली बेवारस वाहने हटवण्यात आली आहेत. पालिकेकेने यासंबंधी अनेकदा नोटीस बजावूनही वाहने हटवण्यात आली नव्हती. मात्र आज कारवाई करत पालिकेने क्रेनद्वारे वाहने हटवून नगरपालिकेच्या जागेत ठेवली.
दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जीवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या हॅंडबॅगमध्ये 7.62 MM राऊंड काडतूस होते. गुलाब शेख असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुलाब हा बिहारचा रहिवाशी आहे.
राजधानी पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटीचे काम पूर्ण करण्यास जून महिन्याच्या अखेरीपर्यंत वेळ द्यावा असा अर्ज इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल केला आहे. हे काम गेल्या 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन कंपनीतर्फे एडव्होकेट जनरल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या दिले होते मात्र हे काम पूर्ण न झाल्याने त्यासाठी आणखी वेळ वाढवून द्यावा यासाठी हा अर्ज केला आहे.
पावसाळी अधिवेशनास 15 जुलैपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी 21 ते 22 दिवसांचा असणार आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
आसगाव येथील टॅक्सी चालक स्वप्नील वाघुले यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी उमेश सत्ते आणि सागर देवर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिस अधिक तपास करतायेत.
यंदाच्या लोकसभा निवडणूकीत दक्षिण गोव्यातून विरियातो फर्नांडिस यांनी भाजपच्या पल्लवी धेंपे यांचा पराभूत करुन बाजी मारली. आता विरियातो म्हणाले की, सूडाच्या राजकारणावर माझा विश्वास नाही. ज्यांनी मला मतदान केले नाही त्यांच्यासह मी संपूर्ण गोव्याचा आवाज होईन. लोकसभा निवडणूकीतील मतदानाचा कल असा सूचित करतो की, 2027 मध्ये विधानसभा निवडणुकीत गोव्यात काँग्रेसला 27 जागा तर अशा एकूण 30 जागांपर्यंत पोहोचेल.
धर्मापूर येथे आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर कार, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. या अपघातात तिघेजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.