सांतिनेजच्या ‘त्या’ अतिक्रमणाचा निकाल तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला राखून; ‘गोमन्तक’ने केला होता पाठपुरावा !

Santinez News: सांतिनेजमधील वेलनेस औषधालयासमोरील अतिक्रमित बांधकामाविषयी सुनावणी पूर्ण होऊन त्याबाबतचा निर्णय तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून राखून ठेवण्यात आला आहे.
सांतिनेजच्या ‘त्या’ अतिक्रमणाचा निकाल  तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला राखून; ‘गोमन्तक’ने केला होता पाठपुरावा !
Tiswadi Sub-District Officer have reserved a decision on encroachment construction in Santinez
Published on
Updated on

सांतिनेजमधील वेलनेस औषधालयासमोरील अतिक्रमित बांधकामाविषयी सुनावणी पूर्ण होऊन त्याबाबतचा निर्णय तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून राखून ठेवण्यात आला आहे. सांतिनेजमधील अतिक्रमणाचा विषय ‘दैनिक गोमन्तक’ने उपस्थित केला होता.

त्या अतिक्रमणाचा अडथळा स्मार्ट सिटीच्या रस्त्याच्या कामाला होत राहिला. त्यामुळे स्मार्ट सिटीचे कामही याठिकाणी थांबलेले आहे. रस्त्याच्या बाजूचा काही भाग दुकानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली बांधकामात समावेश केल्याने स्मार्ट सिटीचे काम रखडले होते. गटाराचे कामही अद्यापी रखडले असून, नव्याने बांधकाम केलेल्या ठिकाणी बीएसएनएलचा चेंबरही दबला गेला आहे.

सांतिनेजच्या ‘त्या’ अतिक्रमणाचा निकाल  तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला राखून; ‘गोमन्तक’ने केला होता पाठपुरावा !
Goa News: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी शिवोलीत नायजेरियन विद्यार्थ्याला अटक; गोव्यातील ठळक बातम्या

दुरुस्तीच्या नावाखाली छोट्या दुकानाचे दोन गाळे तयार करून मोठ्या रकमेत भाड्याने देण्याचा डाव संबंधित मालकाने आखला होता. गाळे निर्माण होताच ती जागा एका मिठाई व्यावसायिकालाही भाड्याने दिली गेली होती; परंतु त्यावर वारंवार आवाज उठवल्याने व्यावसायिकाने आपले फलक व तेथे व्यवसायासाठी आणलेले साहित्य हटविले होते. त्याशिवाय नगरपालिकेने त्या बांधकामाविषयी कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

सांतिनेजच्या ‘त्या’ अतिक्रमणाचा निकाल  तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला राखून; ‘गोमन्तक’ने केला होता पाठपुरावा !
Goa News: कांदा-टोमॅटो महागले! नवरात्रोत्सवाच्या तोंडावर दर वाढण्याचे संकेत; सर्वसामान्यांची महागाईच्या भडक्याने होरपळ

रस्ता रुंदीकरणात अडथळा होत असलेल्या या अतिक्रमणाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना दखल घ्यावी लागली होती. त्यामुळे त्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सोपविण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी कार्यालयात याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून, त्यांनी तो निर्णय राखून ठेवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com