Tiswadi Farmer : मामलेदारांचे आश्‍वासन ; नवी शेतकरी संघटना स्थापन करण्याचा आदेश

वारण-पात्रामण खाजनाचा ताबा शेतकऱ्यांकडे देणार
Establishment new farmers association
Establishment new farmers associationGomantak Digital Team
Published on
Updated on

Tiswadi Farmer : माडेल- चोडण येथील वारण-पात्रामण शेती-खाजनाचा ताबा तेथील शेतकऱ्यांकडे परत देण्यात येईल,असे आश्वासन तिसवाडी मामलेदार कौशिक देसाई यांनी चोडण येथील स्थायी समितीला दिले. या संबधीची निवडणूक प्रकिया करून नवीन शेतकरी संघटना स्थापन करण्याचा आदेशही तलाठी हेमंत नाईक यांना देण्यात आला आहे. शेतकरी संघटनेच्या स्थायी समितीने ९० शेतकऱ्यांच्या सह्या असलेले निवेदन मामलेदार देसाई यांना दिले होते.

तीन वर्षाच्या प्रशासकीय कारभारंनतर वारण व पात्रामण खाजन पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडे येणार असल्याने तेथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन महिन्यापूर्वी वारण मानशी ठेकेदाराने नांगरलेल्या शेत जमिनीत मत्स्य पैदासीसाठी प्रमाणापेक्षा जास्त खारे पाणी घेतले होते. यामुळे तेथे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मिरची व हळसाणे व इतर पिकांची मोठी हानी झाली होती.

Establishment new farmers association
Farmers in Bihar: नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! शेत एक एकर आणि पिकं 36, उत्पन्न किती ?? तुम्हीच बघा...

या मानशीच्या ठेकेदारांच्या या कृतीमुळे तेथील शेतकऱ्यांनी हरकत घेऊन संताप व्यक्त केला. व स्थानिक तलाठी केदार भंडारी, या खाजनावर देखरेख करणारे तिसवाडी मामलेदारांचे अधिकारी हेमंत नाईक, सरपंच -पंढरी वेर्णेकर व शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पहाणी करून याचा अहवाल तिसवाडी मामलेदार यांच्याकडे दिला होता. या खाजनावर गेल्या ३ वर्षापासून प्रशासक म्हणून मामलेदारांची नेमणूक असल्याने शेतकरी हतबल झाले होते.

अन्यायाविरूध्द आवाज उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी एक जाहीर सभा घेऊन श्री विजयानंद मडकईकर यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची अस्थायी समिती निवडण्यात आली. यात सचिवपदी- सुभाष खांडेपारकर, खनिजदार-संजीव सुर्लीकर, सदस्य-श्रीकृष्ण हळदणकर, नागेश कवठणकर, परेश गोवेकर, आनंद कुंडईकर, परूषोत्तम मांर्देकर, शशिकांत मांद्रेकर व सुरेश खांडेपारकर यांची निवड करण्यात आली.

Establishment new farmers association
Farmers Scheme: करोडो शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी, आता 1 रुपयात मिळणार 'हा' फायदा

त्या ठेकेदारांची गय करू नये !

येत्या महिन्याभरात कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून या शेती खाजनाचा ताबा शेतकऱ्यांकडे द्यावा, शेतात खारे पाणी घेणाऱ्या पावणीदाराची गय करू नये, खारे पाणी शेतात घेतल्यास त्याचा पावणीच रद्द करावी, अशी सूचना या स्थायी समितीने देसाई यांच्याकडे केली. मामलेदार कौशिक देसाई यांना दिलेल्या निवेदनावर ९० शेतकऱ्यांच्या सह्या होत्या.

हे निवेदन देताना अध्यक्ष विजयानंद मडकईकर, श्रीकृष्ण हळदणकर, परेश गोवेकर, संजीव सुर्लीकर, शशिकांत मांद्रेकर, नागेश कवठणकर उपस्थित होते. शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देसाई यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com