Polluted Water : प्रदूषित पाण्याची चाचणी; डोंगरीतील तिघांची प्रकृती बिघडली

Polluted Water : ५ मे रोजी धाकटे भाट, डोंगरी येथील जलवाहिनी फुटल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम खात्यात करण्यात आली होती.
Polluted Water
Polluted WaterDainik Gomantak

Polluted Water :

तिसवाडी, आजोशी-मंडूर पंचायत क्षेत्रातील डोंगरी गावात नळातील पाण्यात किडे आढळल्याने लोक भयभीत झाले आहेत. दरम्यान, हे पाणी पिऊन कुर्टीकर कुटुंबातील तीन सदस्यांची प्रकृती बिघडल्यानंतर गुरुवारी आरोग्य विभागाने या परिसराचे निरीक्षण केले आणि पाण्याची नमुने तपासणीसाठी गोळा केले.

५ मे रोजी धाकटे भाट, डोंगरी येथील जलवाहिनी फुटल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम खात्यात करण्यात आली होती. जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली, परंतु त्यानंतर पाणी पिऊन एकाच कुटुंबातील तीन सदस्य आजारी झाले.

त्यांना पोटदुखी, उलट्या आणि चक्कर येत होती. यात एका वृद्धेसह दोन महिला व मुलाचा समावेश होता. सर्वांना उपचारासाठी मंडूर येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात नेण्यात आले होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.

याबाबत माहिती गावात पसरल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर गुरुवारी सर्वजनिक बांधकाम आणि आरोग्य खात्याने जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच चाचणीसाठी पाण्याचे नमुने घेतले.

गावातील जलवाहिनी ही गटारातून गेली असून येथे घाण सोडले जात असल्याने हा प्रकार घडला आहे. जलवाहिनी फुटल्याने पाणी प्रदूषित होऊन हा प्रकार घडला आहे. पावसाच्या पाण्यासाठी हे गटार बांधण्यात आले होते, परंतु त्यात घाण केली जात आहे, असे एका स्थानिकांचे म्हणणे आहे.

Polluted Water
Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

पाण्याचे नमुने पाठविले तपासणीसाठी

पाणी पिल्यानंतर माझी आई, वहिनी आणि पुतण्या यांच्या प्रकृती बिघडली. त्यामुळे तातडीने त्यांना मंडूर येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी आणले. भावाने पाणी तपासले तेव्हा त्यात किडे सापडले. त्यानंतर आम्ही आरोग्य खात्यात तक्रार केली.

- शुभम कुर्टीकर, धाकटेभाट, डोंगरी

धाकटे भाट, डोंगरी येथे घडलेल्या प्रकरणाची नोंद घेऊन आज आरोग्य खात्याने पाहणी केली आहे. आम्ही पाण्याचे नमुने घेतले असून चाचणीसाठी ते पाठवण्यात आले आहे. दहा दिवसात अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.

- डॉ. केदार रायकर, आरोग्य खाते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com