Tinder Scam: 'टिंडर'वर मैत्री, गोव्यात बोलावले अन् 'पोक्सो'ची धमकी! ज्येष्ठ नागरिकाला 95 हजारांचा गंडा

Tinder Dating App Scam in Goa: डेटिंग ॲपवर ओळख वाढवून गोव्यात बोलावले आणि ‘पोक्सो’च्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मुंबईतील एका ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Tinder Dating App Scam in Goa
Tinder ScamDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: डेटिंग ॲपवर ओळख वाढवून गोव्यात बोलावले आणि ‘पोक्सो’च्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मुंबईतील एका ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी चैताली लक्ष्मण क्षीरसागर, काव्या शर्मा आणि अन्य पाच अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील विलेपार्ले येथे राहणाऱ्या तक्रारदाराची ‘टिंडर’ ॲपवर चैतालीशी ओळख झाली. तिने त्यांना गोव्यात भेटण्यासाठी बोलावले. बागा-हडफडे येथील एका व्हिलामध्ये १० डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री चैतालीने काव्या आणि अन्य एका महिलेला बोलावले. त्यानंतर दोन तरुण आणि एक महिला तेथे आले. त्यांनी तक्रारदाराला मारहाण करून ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

Tinder Dating App Scam in Goa
Goa AAP: महिलांना दरमहा 3 हजार, कुटुंबांना 10 लाखांचा आरोग्य विमा... 'आप'कडून गोमंतकीयांसाठी सहा मोठ्या घोषणा

संशयितांनी तक्रारदाराचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ चित्रित करून ते नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली. त्याद्वारे ५० हजार रुपये रोख आणि ४५ हजार रुपये ऑनलाइन, असे एकूण ९५ हजार रुपये उकळले.

तसेच २० ग्रॅमची सोन्याची अंगठी, ४० ग्रॅमची साखळी आणि सुमारे ७० हजार रुपये किमतीचे ‘राडो’ घड्याळ हिसकावून घेतले. त्यानंतर तक्रारदाराला व्हिलामध्ये कोंडून संशयित पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

Tinder Dating App Scam in Goa
Goa Municipal Elections: गोव्यात नगरपालिका निवडणुका फेब्रुवारी 2027 मध्ये? उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे राजकीय घडामोडींना वेग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com