Tillari Dam
Tillari Dam GoaDainik Gomantak

Tillari Canal: तिळारी कालव्‍यांची स्‍वच्‍छता, लायनिंगची कामे होणार! विधानसभेत जलस्रोतमंत्री शिरोडकरांची हमी

Subhash Shirodkar: तिळारी कालव्‍याला वॉटरप्रुफिंग केलेले नाही. अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. गतवर्षीच्‍या मुसळधार पावसामुळे या कालव्‍याला पूर येऊन सडये भागातील नागरिक, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.
Published on

पणजी: तिळारी धरणातून गोव्‍यात येणाऱ्या दोन्‍ही कालव्‍यांच्‍या लायनिंग आणि स्‍वच्‍छतेचे काम येत्‍या नोव्‍हेंबर किंवा डिसेंबरपासून हाती घेण्‍यात येईल, अशी हमी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी मंगळवारी विधानसभा सभागृहात बोलताना दिली.

आमदार दिलायला लोबो यांनी याबाबत प्रश्‍न विचारला होता. तिळारीतून येणाऱ्या कालव्‍याला वॉटरप्रुफिंग केलेले नाही. अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. गतवर्षीच्‍या मुसळधार पावसामुळे या कालव्‍याला पूर येऊन सडये भागातील नागरिक, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. पुढील काळात अशा प्रकारच्‍या घटना घडू नयेत यासाठी जलस्रोत खात्‍याने कोणत्‍या उपाययोजना केल्‍या आहेत? असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला होता.

त्‍यावर बोलताना मंत्री शिरोडकर म्‍हणाले, दोडामार्गपासून गोव्‍यात येणाऱ्या तिळारी कालव्‍याच्‍या लायनिंग कामासाठी १५ जुलै २०२४ रोजी सुमारे ९.७५ कोटींची निविदा जारी करण्‍यात आली. त्‍याची वर्कऑर्डरही काढण्‍यात आलेली आहे. गतसाली जुने गोवेतील शवप्रदर्शन सोहळ्यामुळे हे काम स्‍थगित ठेवण्‍यात आले होते.

Tillari Dam
Tilari Dam: गोव्यात तिळारीचे पाणी अखेर पोहचले मात्र, पर्वरी जलप्रकल्पातून वितरणास लागणार कालावधी

या प्रदर्शनाच्‍या निमित्ताने गोव्‍यात येणाऱ्या लाखो भाविकांसमोर पाण्‍याचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठीच काम पुढे ढकलण्‍यात आले होते. परंतु येत्‍या नोव्‍हेंबर किंवा डिसेंबरपासून हे काम सुरू करण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

Tillari Dam
Mhadei River: ‘म्हादई’चा कायदेशीर लढा होणार खडतर! केरकर यांचे प्रतिपादन; गोमंतकीय अधीक्षक अभियंता होणार निवृत्त

१५ लाख चौ.मी. जमीन लागवडीखाली

चर्चेत सहभागी झालेले विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कालव्‍यांच्‍या बाजूचा कमांड एरिया लागवडीखाली आणण्‍यासाठी जलस्रोत खात्‍याने कोणते प्रयत्‍न केले आणि त्‍याचा किती जणांना फायदा मिळाला, असा प्रश्‍न विचारला. त्‍यावर, याबाबत शेतकऱ्यां‍चा निश्‍चित आकडा नाही. परंतु उत्तर गोव्‍यातील १५ लाख चौरस मीटर जमीन लागवडीखाली आणण्‍यासाठी खात्‍याने प्रयत्‍न सुरू केले आहेत. मयेत ३५ कोटी खर्चून ७०० चौरस मीटर जमीन लागवडीखाली आणण्‍यात येणार असल्‍याची माहिती मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com