Tilari Canal: तिळारी कालव्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती! गोवा देणार 75 टक्के निधी तर महाराष्ट्राचा 25 टक्के वाटा; 1 सप्टेंबरपासून पाणीपुरवठा

Goa Maharashtra Tilari Canal: ‘‘काडाच्‍या बुधवारच्‍या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन काही महत्त्‍वपूर्ण निर्णय घेण्‍यात आलेले आहेत.
Goa Maharashtra Tilari Canal
Tilari CanalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘‘कमांड एरिया विकास प्राधिकरणाच्‍या (काडा) बुधवारी झालेल्‍या बैठकीत आणखी २९२ हेक्‍टर जमीन ‘काडा’अंतर्गत आणण्‍याचा तसेच ३२ हेक्‍टर जमीन वगळण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला’’, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

‘‘काडाच्‍या बुधवारच्‍या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन काही महत्त्‍वपूर्ण निर्णय घेण्‍यात आलेले आहेत. त्‍यात विविध भागांतील आणखी २९२ हेक्‍टर जमीन ‘काडा’अंतर्गत आणण्‍याचा आणि ३२ हेक्‍टर जमीन वगळण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. याशिवाय उत्तर गोव्‍यातील जनतेसाठी महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या तिळारी कालव्‍याचे काम सुरू करण्‍याबाबत चर्चा झाली. या कामासाठी गोवा सरकार ७५ टक्‍के आणि महाराष्‍ट्र सरकार २५ टक्‍के निधी देणार आहे’’, असे मंत्री शिरोडकर म्‍हणाले.

Goa Maharashtra Tilari Canal
Goa Assembly Election: गोव्यात विरोधकांच्या आघाडीची जोरदार तयारी! काँग्रेसची 'आरजी', 'आप'सोबत दोन दिवसांत चर्चा; गोवा फॉरवर्डशीही बोलणी करण्याचे चोडणकरांचे संकेत

१ सप्‍टेंबरपासून करणार पाण्‍याचा पुरवठा

‘‘तिळारी धरणातून गोव्‍याला मोठ्या प्रमाणात पाण्‍याचा पुरवठा होतो; परंतु महाराष्‍ट्राच्‍या हद्दीतील सुमारे २२ किमी. लांबीच्‍या कालव्‍याचे काम गेल्‍या अनेक वर्षांपासून ठप्‍प होते. ते आता सुरू करण्‍यात येणार आहे.

कामादरम्‍यान जलशुद्धीकरण प्रकल्‍पाला पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी आमठाणे ते कुचेलीदरम्‍यान पाईपलाईन टाकण्‍यात आली आहे. या पाईपलाईनची चाचणी करण्‍यात येत असून, येत्‍या १ सप्‍टेंबरपासून या पाईपलाईनद्वारे पाण्‍याचा पुरवठा केला जाणार आहे’’, असेही मंत्री शिरोडकर यांनी नमूद केले.

Goa Maharashtra Tilari Canal
Goa Politics: काँग्रेसचे 'तिकीट' विक्रीसाठी? नुवेच्या उमेदवारीवरून भाजपचा थेट सवाल; कार्यालयाच्या जागेच्या व्यवहाराबाबत मागितला खुलासा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com