मोले महावीर अभयारण्य परिसरात पट्टेरी वाघाचा संचार

आसपासच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे वन खात्याचे निर्देश
Tiger spotted in molem
Tiger spotted in molemDainik Gomantak

पणजी : मोले येथील भगवान महावीर अभयारण्य परिसरात पट्टेरी वाघाचा संचार असल्याचं निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर वन खात्याने स्थानिकांना सतर्क केले आहे. नागरिकांनी जंगलात जाताना सतर्क राहावं आणि कामाशिवाय जंगलात जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. (Tiger spotted in molem News Updates)

Tiger spotted in molem
माशेलात दीड लाखांचा गांजा जप्त, परप्रांतीय तरुण अटकेत

पश्चिम घाट परिसरातील पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा हा महावीर अभयारण्याचा भाग आहे. मागच्या काही दिवसात या वनक्षेत्रात वाघाच्या (Tiger) अस्तित्वाच्या खुणा दिसून आल्या आहेत. त्यामुळे वनविभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आसपासच्या गावातील पंचायतींना सूचना दिल्या आहेत.

Tiger spotted in molem
मेणकुरेतील नैसर्गिक तळीला मिळणार नवा साज

मोले अभयारण्य क्षेत्राचे वनाधिकारी डॉ. सिद्धेश नाईक यांनी या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकांना सतर्क करताना या राखीव वनक्षेत्रात (Forest) लोकांनी आपली गुरे वा बकऱ्या चरण्यासाठी सोडू नयेत तसेच लाकूडफाटा आणण्यासाठी या वनक्षेत्र परिसरात जाऊ नये असे सूचित केले आहे. आसपासच्या पंचायतींना (Panchayat) याबाबत सूचना जारी करण्यात आली असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com