Calangute Tibet Market: कळंगुटमधील तिबेटी लोकांचा दलाई लामांना पाठिबा; वादग्रस्त व्हिडिओचा केला निषेध

मूक आंदोलनाद्वारे दलाई लामांना दर्शविला पाठिंबा
Calangute Tibet Market
Calangute Tibet MarketDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Tibet Market : तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपुर्वी व्हायरल झाला होता. त्यावरून बरेच वादळ उठले होते. टिका-टिपण्णीही झाली होती

त्या पार्श्वभुमीवर कळंगुट येथील तिबेटी लोकांनी या व्हिडिओचा निषेध केला. तसचे कळंगुटमधील तिबेट मार्केटमध्ये दलाई लामांच्या समर्थनाथ मूक आंदोलन केले.

Calangute Tibet Market
Goa G20 Summit 2023: रॉस ऑम्लेट, लाल भात, लँब विंडालो, फिश करी... G20 च्या प्रतिनिधींसाठी खास गोवन पदार्थांची मेजवानी

दलाई लामा एका मुलाला आशीर्वाद देताना त्याचे चुंबन घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे तिबेटी लोकांच्या भावना दुखावल्या होत्या.

तिबेटी वंशाचा वैद्यकीय विद्यार्थी तेनझिन याने जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या चौदाव्या दलाई लामांच्या लीक झालेल्या व्हिडिओ फुटेजविरोधात आपले म्हणणे मांडले.

जुन्या व्हिडिओ क्लिप मु्द्दाम अपमानित करण्यासाठी पसरवल्या जात आहेत. तिबेटमध्ये जुलेधा नावाची परंपरा आहे. त्यात वडील मुलाचे चुंबन घेतात. हा भावनिक मुद्दा आहे.

Calangute Tibet Market
Goa G20 Summit 2023: गोव्यातील G20 बैठकीसाठी 'अशी' आहे सुरक्षाव्यवस्था; जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर

दरम्यान, विंझिन नावाच्या विद्यार्थ्याने सांगितले की, जुना व्हिडिओ प्रसारित करून समाजात चुकीचा संदेश पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कृत्याला कुणीही बळी पडू नये. हा व्हिडिओ एडिटेड आहे.

लोकांनी योग्य माहिती घेऊन व्यक्त व्हावे. अर्धवट माहितीवरून दलाई लामांवर टिका करणाऱ्या सेलिब्रिटींचाही यावेळी निषेध करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com