Goa G20 Summit 2023: गोव्यातील G20 बैठकीसाठी 'अशी' आहे सुरक्षाव्यवस्था; जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर

आजपासून प्रारंभ; 19 देशांच्या एकूण 189 प्रतिनिधींचा सहभाग
Goa G20 Meet
Goa G20 MeetDainik Gomantak
Published on
Updated on

Goa G20 Summit 2023: सध्या G20 ग्रुपचे अध्यक्षपद भारताकडे असून भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात गोव्यात G20 च्या बैठकीला आज, सोमवार 17 एप्रिलपासून सुरवात होत आहे. 19 एप्रिलपर्यंत ही बैठक चालणार आहे. दरम्यान, या बैठकीसाठी गोवा सज्ज झाला आहे.

या बैठकीला 19 सदस्य देशांचे एकूण 189 प्रतिनिधी येणार आहेत. याशिवाय 10 आमंत्रित राज्ये आणि 22 आंतरराष्ट्रीय संघटनाही या तीन दिवसीय बैठकीत सहभागी होणार आहेत.

Goa G20 Meet
Domestic Violence Cases in Goa: राज्यात वर्षभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या 189 घटना

दरम्यान, गोव्यात G20 च्या बैठकीतील प्रतिनिधींसाठी 770 सुरक्षा अधिकारी, 196 पोलिस अधिकारी, 89 वाहने तैनात केली आहेत.

दोन देशांत कम्युनिकेशनसाठी 112 अधिकारी नेमले आहेत. अन्न आणि औषध विभागात 13 अधिकारी नेमले गेले आहेत. बैठकीसाठी विमानतळावरही 84 अधिकारी काम पाहात आहेत. याशिवाय अग्निशमन दलाच्या 115 तर 8 रूग्णवाहिका तैनात केल्या आहेत.

G20 गटातील देश/संघटना

अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रिपब्लिक ऑफ कोरिया, रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिका, रशिया, सौदी अरेबिया, तुर्की, युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका, युरोपियन युनियन.

Goa G20 Meet
Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांत वाढ; जाणून घ्या आजचे इंधनाचे दर

गोव्यात होणाऱ्या G20 एकूण 8 बैठका

दिनांक प्रोग्रॅम

  • 17 ते 19 एप्रिल -------- हेल्थ वर्किंग ग्रुपची दुसरी बैठक

  • 9 ते 11 मे -------------- डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपची तिसरी बैठक

  • 5 ते 7 जून -------------- फायनान्शियल, आर्किटेक्चर वर्किंग ग्रुपची तिसरी बैठक

  • 12 ते 14 जून ---------- एसएआय २० समिट

  • 19 ते 20 जून----------- टुरिझम वर्किंग ग्रुपची चौथी बैठक

  • 21 ते 22 जून----------- टुरिझम वर्किंग ग्रुप बैठक

  • 19 ते 20 जुलै ---------- एनर्जी वर्किंग ग्रुपची चौथी बैठक

  • 22 जुलै ----------------- एनर्जी वर्किंग ग्रुप बैठक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com