Calangute News: तिघा चोरट्यांना कळंगुटमध्ये अटक

पेडणे पोलिसांची कारवाई : 13 लाखांचा ऐवज जप्त; पाच दिवस कोठडी
Calangute News
Calangute NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या दोन महिन्यात पेडणे तालुक्यातील मोरजी, मांद्रे, हरमल आदी किनारी भागात देशी व विदेशी पर्यटकांना लक्ष करून त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या केरळ व कर्नाटकमधील चोरट्यांच्या टोळीतील तीन संशयितांना पेडणे पोलिसांनी आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कळंगुट येथे जाऊन शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 13 लाख रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.

मंगळवारी (ता.28) मोरजी येथे एका हॉटेलमधून मुंबईहुन आलेल्या नितेश ठाकूर व अन्य पर्यटकांच्या लाखो रुपयांच्या मालाची चोरी झाली होती. यासंबंधी पेडणे पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला असता या चोरी प्रकरणातील संशयित आरोपी कळंगुट परिसरात असल्याची तांत्रिक व विश्‍वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली.

त्यानुसार पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक दत्ताराम राऊत, उपनिरीक्षक हरिष वायंगणकर व विवेक हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक मंगळवारी रात्री कळंगुट येथे जाऊन आरोपींना अटक केली.

शरिफ अब्दुल रेहमान (45, कुंदेरी, वायथुर, कन्नूर-केरळ), शाजी मदवन पी. एम., (42, सिद्धपुरा, गुय्या, विराजपेट, कोडगू-कर्नाटक), श्रीतु सी. एस. सुनिल कुमार (30, चेरुविला पुथेन विडू, कोलिथट्टू, इरिट्टी, कन्नूर-केरळ) या तिघांना मुद्देमालासह अटक केली.

बुधवारी (ता. 1) संशयितांना पेडणे प्रथम श्रेणी न्यायालयापुढे उभे केले असता चौकशीसाठी पाच दिवसांची कोठडी देण्यात आली.

Calangute News
भुईपाल पुलाच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ

किमती ऐवज : संशयित चोरट्यांकडे रिट्झ कार, विविध ब्रँडचे स्मार्ट फोन, व्यावसायिक कॅमेरे, ॲपल एअरपॉड्‍स, वायरलेस ब्लूटूथ, इअरफोन, ब्लूटूथ स्पीकर्स, मनगटी घड्याळे आणि इतर सर्व वस्तू मिळून 13 लाख रुपयांपेक्षा जास्त ऐवज मिळाला.

Calangute News
Work of Protective Wall: सुर्लात पुलाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला गती

संशयितांची माणुसकी...

पहाटे 4 वाजता या चोरट्यांनी मुंबईतील पर्यटक गाढ झोपेत असताना ते रहात असलेल्या हॉटेलच्या खोलीत शिरून चोरी केली. चोरी करताना बिंधास्तपणे आपल्याच घरात वावरल्यासारखे वावरले. चोरीचा माल नेल्यावर हॉटेलच्या बाहेर येरझाऱ्या घालताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले.

हॉटेलच्या बाहेर आल्यावर बॅगमधील साहित्य त्यांनी तपासून बघितले. एका बॅगमध्ये त्याना कपडे तसेच आधारकार्ड , ड्रायव्हिंग लायस्न्स दिसल्यावर त्यातील एका चोरट्याने ती बॅग परत येऊन खोलीच्या बाहेर ठेवून गेल्याचेही दिसते. यावरून या संशयितांनी चोरी केली तरी त्यांच्यात माणुसकीही असल्याचे दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com