Goa Accident: डिचोलीत भीषण अपघात! बगलमार्गावर व्हाळशी जंक्शनजवळ वाहनाची झाडाला जोरदार धडक; कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

Bicholim Accident News: एक जीपगाडी (Jeep) डिचोलीच्या बगलमार्गावरुन वेगाने जात होती. व्हाळशी जंक्शनजवळ आल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
Bicholim Accident News
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Accident News: डिचोलीतून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. डिचोलीतील बगलमार्गावर (Bypass Road) व्हाळशी जंक्शनजवळ (Vhalshi Junction) झालेल्या या अपघातात कर्नाटकमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक जीपगाडी (Jeep) डिचोलीच्या बगलमार्गावरुन वेगाने जात होती. व्हाळशी जंक्शनजवळ आल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे गाडी भरकटली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाला जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की, जीपगाडीचे समोरील मोठे नुकसान झाले आणि गाडीचा चक्काचूर झाला.

Bicholim Accident News
Goa Accident: 'भाऊबीजेची ओवाळणी ठरली शेवटची'! गोव्यातून परत येताना दुचाकी झाडावर आदळली; 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि डिचोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जीपगाडीत अडकलेल्या तिन्ही जखमींना त्वरीत बाहेर काढण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. तिन्ही जखमी व्यक्ती कर्नाटक राज्यातील रहिवासी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Bicholim Accident News
Goa Accident: ताबा सुटला, गोव्यात पर्यटकाची कार भिंतीला - ट्रकला धडकली; झारखंडची व्यक्ती जागीच ठार; Watch Video

डिचोली पोलिसांनी या अपघाताची (Accident) नोंद घेतली असून अपघातामागचे नेमके कारण काय होते? वाहन चालवताना अतिवेग होता की चालकाला झोप लागली होती? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे डिचोली बगलमार्गावर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com