Dabolim Airport: व्हिलचेअरसाठी खंडणी! दाबोळीवर इंग्लंडच्या दिव्यांग ज्येष्ठ महिलेसोबत गैरव्यव्हार, तक्रार दाखल

इंग्लंडची रहिवाशी असलेल्या या महिलेने विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak

दाबोळी विमानतळावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिव्यांग असलेल्या एका ज्येष्ठ परदेशी महिलेकडून व्हिलचेअरसाठी खंडणी घेतली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

जानेवारी महिन्याच्या अखेरीस ही घटना घडली असून, इंग्लंडची रहिवाशी असलेल्या या महिलेने विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Dabolim Airport
Tejashwi Yadav: गोवा नव्हे बिहारमध्ये येतात सर्वाधिक पर्यटक! उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, कॅथरिन फ्रान्सेस वोल्फ (वय 62) या दिव्यांग असलेली ज्येष्ठ महिला गोव्यातून इंग्लंडला प्रवास करणार होत्या. कॅथरिन यांना नैराश्याचा देखील त्रास असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, दाबोळी विमानतळावर त्यांना व्हिलचेअरचा वापर करण्यासाठी त्यांच्याकडून 4,000 रूपये खंडणी घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विमानतळावर त्यांच्यासोबत झालेल्या गैरव्यव्हार प्रकरणी त्यांनी विमानतळ पोलिस, दक्षिण गोवा पोलिस आणि पोलिस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली आहे. 29 जानेवारी 2023 रोजी ही घटना घडली.

Dabolim Airport
Mahadayi Water Dispute: मंत्री नाईक माहित नाही पण सार्दिन लोकसभेत म्हादईचा मुद्दा मांडणार - गोवा काँग्रेस

मुरगाव येथे झाली होती अमेरिकन पर्यटकांची अडवणूक

दरम्यान गेल्या वर्षी वर्षाअखेरीस अमेरिकेतून आलेल्या एका क्रुझमधील पर्यटकांची टॅक्सी चालकांनी अडवणूक केली होती. बसमधून प्रवास करण्यास मज्जाव करत त्यांना टॅक्सीने प्रवास करण्याची सक्ती केली जात होती. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली होती.

अशा प्रकारच्या घटना गोव्यात सहन केल्या जाणार नाहीत असे मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांनी म्हटले होते. तसेच, याप्रकरणी टॅक्सी चालकांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, त्यानंतर दाबोळी विमानतळावर परदेशी महिलेसोबत गैरव्यव्हार करत तिच्याकडून अवैध पद्धतीने पैसे उकळल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com