Goa Accident: ‘थर्टिफर्स्ट’ची रात्र चौघांना ठरली अखेरची!

Goa Accident: अपघाती मृत्‍यू : ‘स्‍मार्टसिटी’च्‍या खड्ड्यात पडून माजी नगरसेवकाच्‍या मुलाचा बळी
Accident Cases in Goa
Accident Cases in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident: नववर्षाची पूर्वरात्र आणि नववर्षाचा प्रारंभ दुचाकीस्वारांसाठी कर्दनकाळ ठरला. 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या पहाटे राज्यात चार ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांत चौघांचा बळी गेला आहे. मळा-पणजी येथे स्मार्टसिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात मोटारसायकलसह पडून रायबंदर येथील आयुष रुपेश हळर्णकर याचा मृत्यू झाला.

Accident Cases in Goa
Naxalite In Goa:...तर नक्षलींना अटक करा

ताळगाव येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर टक्कर होऊन छत्तीसगड येथील जीवयानुस लाकरा (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला. भोम येथे दुचाकीची वीज खांबाला धडक बसून दुचाकीस्वार प्रतिम रोमन बोरा (३१, भोम-बाणस्तारी, मूळ आसाम) याचा मृत्यू झाला, तर वाळपई येथे कार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पोलिस कॉन्स्टेबल उल्हास गावकर (३२, डोंगुर्ली-ठाणे) यांचा मृत्यू झाला.

पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या मळा येथील मलनिस्सारण कामाच्या ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास रायबंदर येथील माजी नगरसेवक रुपेश हळर्णकर यांचा मुलगा आयुष रुपेश हळर्णकर हा दुचाकीसह खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला. याचे खापर लोकांनी कंत्राटदारावर फोडले असले

Accident Cases in Goa
Seaweed: समुद्री शेवाळापासून लगदा व बायोप्लॅस्टिक!

तरी कंत्राटदारांनी तो दावा फेटाळून लावला आहे. कामाच्या ठिकाणी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या, असा दावा कामाच्या पर्यवेक्षक तथा साहाय्यक अभियंत्या रश्‍मी शिरोडकर यांनी केला आहे. ताळगाव येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात छत्तीसगड येथील जीवयानुस लाकरा याचा मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. जीवयानुस हा करंझाळे येथील सुपरमार्केटमध्ये कामाला होता.

खड्ड्यात पडून ठार

पणजीचे माजी नगरसेवक रुपेश हळर्णकर यांचा मुलगा आयुष हा स्मार्टसिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू पावल्याची माहिती मिळताच पणजीचे स्थानिक आमदार व मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी त्वरित कामाच्या पर्यवेक्षक तथा अभियंता रश्‍मी शिरोडकर यांना पाचारण करून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. तेथे अनेक दिवसांपासून पथदीप लागत नसल्याचे तसेच रिफ्लेक्टर लावण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले.

वाढदिनीच काळाचा घाला

मडकई (वार्ताहर)ः भोम येथे दुचाकीची वीज खांबाला धडक बसून दुचाकीस्वार प्रतिम रोमेन बोरा (वय ३१, भोम-बाणस्तारी, मूळ आसाम) याचा त्याच्या वाढदिनीच मृत्यू झाला. वाढदिवस साजरा करण्यासाठी साहित्य कमी पडल्याने तो म्हार्दोळ बाजारात गेला होता, तेथून परतताना काल रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात प्रतिमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले, पण तेथे त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. प्रतिम खोर्ली येथील एका कारखान्यात कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.

कॉन्स्टेबलचा मृत्यू

वाळपई (वार्ताहर): वेळूस येथे दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक पोलिस कॉन्स्टेबल उल्हास गावकर (३२) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो आपल्या दुचाकीवरून (क्र. जीए - ०४ - जी - ९३४१) डोंगुर्ली - ठाणे येथून फोंडा पोलिस स्थानकात ड्युटीवर जात असताना वेळूस येथे गजानन सुहास नाईक याच्या कारची (क्र. जीए - ०७ - एल -२००९) धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला गोमेकोत हलविल्यानंतर तेथे त्याचे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com