
Crime news Goa latest: गोव्यासाठी आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला. अवघ्या काही तासांत विविध ठिकाणी चार मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांना रविवार (दि.२४) मांडवी नदीत एका ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला, जो शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेज (GMC) मध्ये पाठवण्यात आला आहे.
याच दिवशी सकाळी ओल्ड गोवा येथील रस्त्याच्या कडेलाही एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ काही बॅगा आणि वैयक्तिक वस्तू पडलेल्या होत्या, तसेच त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणाही होत्या.
हा अपघात आहे की घातपात, याबद्दल संशय व्यक्त केला जातोय. प्राथमिक माहितीनुसार, हा तरुण मृतदेह सापडलेल्या ठिकाणी असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता आणि त्याच इमारतीत राहत होता. ओल्ड गोवा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला आहे.
या दोन घटनांच्या काही तासांनंतरच तिसरा मृतदेह 'अन्नपूर्णा बार अँड रेस्टॉरंट'जवळील नाल्यात आढळला. या घटनेचीही माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
या घटनांचा पोलिस तपास करत असतानाच, आता चौथा मृतदेह आमोणा पुलाजवळच्या नदीत आढळून आला आहे. सकाळी ११:४५ वाजताच्या सुमारास आमोणा पुलाजवळ नदीत एक मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह बाहेर काढला, त्यानंतर डिचोली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.
एकाच दिवशी चार ठिकाणी मृतदेह आढळल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तिन्ही प्रकरणांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत असून ते पुढील तपशीलाची प्रतीक्षा करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.