Mandovi River Cruise Sink: किनाऱ्यावर नांगरलेल्या बोटीत शिरलं पाणी, मांडवी नदीत 'क्रूझ' बुडाली; राज्यात पावसाचं थैमान

Goa Cruise Ship Mishap: गेल्या दोन दिवसांपासून गोव्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मांडवी नदीमध्ये नांगरलेली एक क्रूझ बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली
goa river boat accident
goa river boat accidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या दोन दिवसांपासून गोव्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मांडवी नदीमध्ये नांगरलेली एक क्रूझ बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानिक जलवाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली असून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आणि सध्या याचा अधिक तपास सुरू आहे.

'अचानक' क्रूझ बोट का बुडाली?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही क्रूझ बोट मांडवी नदीच्या किनाऱ्यावर नांगरलेली होती. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बोटीत पाणी शिरल्याने ती बोट बुडली असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. सततच्या पावसामुळे बोटीत पाणी साचून तिचे संतुलन बिघडले असावे आणि त्यामुळे ती बुडाली असा प्राथमिक अंदाज आहे.

goa river boat accident
Mandovi Bridge Accident: मांडवी पुलाजवळ भीषण अपघात! कारला दुचाकी धडकल्या; दोन्ही चालक गंभीर जखमी

स्थानिक जलवाहतूक अधिकारी आणि तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले असून, या घटनेचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, बोटीचे किती नुकसान झाले आहे आणि त्यामुळे पर्यावरणावर काही परिणाम झाला आहे का, याचीही पाहणी केली जात आहे.

या घटनेमुळे मांडवी नदीत जलवाहतूक करणाऱ्या इतर बोटींच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसांत हवामान विभागाने आणखी पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. या संदर्भात अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

'बेती' फेरी बोट बुडाल्याची घटना

यापूर्वी फेरीधक्क्यावर 'बेती' फेरी बोट बुडाल्याची घटना घडली होती. घटना घडली त्यावेळी सुदैवाने बोटीत कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. फेरीत दोन ते तीन कर्मचाऱ्यांच्या दुचाकी असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीनी वर्तवली . समोवारी (२३ जून) सकाळी चोडण येथे ही घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बोटीतून पाणी बाहेर काढण्याचे काम सुरु केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com