Goa Forests Fire : वणव्यामुळे जंगलातील दुर्मीळ प्रजातींवर संकट : डॉ. मल्लपती जनार्दनम

जैवविविधतेला मोठा धोका शक्य, पक्षांची अंडी, पिल्ले भस्मसात
Fire in Goa
Fire in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

कोणत्याही जंगलात लागलेली आग किंवा वणवे हे तिथल्या जैवविविधतेला मोठा धोका असतात. या वणव्यामुळे काही जंगलातील दुर्मीळ प्रजाती कायमच्या नष्ट होतात. सध्या पेटलेल्या ‘वणव्या’मुळे अनेक प्रजातीवर संकट कोसळले आहे.

राज्यात अनेक अभयारण्य आणि जंगलांमध्ये आगी लावल्या जात आहेत. या घटना भविष्याच्या दृष्टीने गंभीर आणि भयावह आहेत, असे मत ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मल्लपती जनार्दनम यांनी व्यक्त केले आहे.

अरबी समुद्राला समांतर पसरलेला सह्याद्री अर्थात पश्चिम घाट जैवविविधतेच्या दृष्टीने अनेक अर्थाने समृद्ध आणि संपन्न आहे. गोवा या सह्याद्री घाटातील मधला कॉरिडोर आहे. पृथ्वीवर केवळ या भागातच अनेक प्रदेशनिष्ठ (इंडेमिक) जाती आणि प्रजातीच्या प्राणी, पक्षी, वनस्पती आढळून येतात.

Fire in Goa
Goa Weather: गोव्यात 'या' दिवशी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

वनस्पतीच्या दृष्टीने विचार केला, तर प्रत्येक ऋतूंमध्ये या वनस्पतींमध्ये विशिष्ट प्रकारचे बदल होत असतात. प्रत्येक वनस्पतीला ऋतू महत्त्वाचा असतो. अशा प्रकारच्या आगीमुळे दुर्मीळ होत चाललेल्या वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती आहे.

सध्या वन खात्याच्या वतीने प्राणी पक्षी आणि वनस्पती धोका नसल्याचे सांगितले जात असले तरी दुर्गम, डोंगराळ, डोंगरमाथे आणि कड्यांवर काही वनस्पती उगवतात ज्या वनस्पती अत्यंत दुर्मीळ आणि कमी स्वरूपात टिकून आहेत.

त्या कायमच्या नष्ट होऊन त्यांची जागा इथल्या निसर्गाला घातक असणारे घाणेरी, गाजर गवत सारखे तण (विड) घेण्याची शक्यता असते. कारण हे तणे अशी आगींना दाद देत नाहीत.

या उलट गवत आणि झुडूपवर्गीय दुर्मीळ वनस्पती अशा वणव्यांमुळे नष्ट होण्याची भीती असते. कारण उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या वनस्पतींना फळे येतात, ही फळे जंगलभर पसरलेली असतात आणि वणव्यात ती जळून खाक होतात.

Fire in Goa
Goa Shigmotsav 2023 : मेरशी जंक्शनवर चित्ररथाची मोडतोड: दोन गटांत धक्काबुक्की

माळरानावर गंभीर परिणाम

जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे प्रामुख्याने माळरानावर किंवा डोंगरमाथ्यावरील जैवविविधता धोक्यात येते. हे डोंगरमाथे किंवा सडे इतर प्राणी जीवनासाठीही अत्यंत उपयुक्त असतात.

पावसाळ्यात इतर कीटक, प्राण्यांमुळे होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी मोठे गवे, सांबर हरणासारखे तृणहरी प्राणी या सड्यांचा आसरा घेतात. तेथील वनस्पतींवर आपली उपजीविका करतात. अशा प्रकारच्या वणव्यांमुळे जैवविविधता धोक्यात येते.

अनेक झुडूप वर्गीय वनस्पती, ग्राउंड आर्किड केवळ या सड्यांवरच आढळून येतात. सध्या म्हादई खोऱ्यातील महत्त्वाचे डोंगरमाथे जळून खाक झाले आहेत. याचा फटका भविष्यातही बसेल, असेही डॉ. जनार्दनम म्हणाले.

जंगलातील वनस्पती धोक्यात

जंगलांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. काही वनस्पती मोठ्या झाडांच्या सावलीत वाढतात या सावलीत वाढणाऱ्या झुडूपवर्गीय, ऑर्किड,सपुष्प वनस्पती प्रामुख्याने तळात किंवा तळाजवळ भागांमध्ये असतात. त्यांना सरळ सूर्यकिरणांचाही संपर्क नसतो, अशा वनस्पती या जंगलांना लागलेल्या आगीमुळे कायमच्या नष्ट होतात.

याचा मोठा फटका इथल्या हवामानावर ही बसण्याची शक्यता आहे. जंगलांची एकूण परिस्थिती संपन्न करणारी एक साखळी असते. यामध्ये कोणताही घटक कमी झाला, तर तो इतर घटकांवर विपरीत परिणाम करतो, असे डॉ जनार्दनम यांनी सांगितले.

पक्षी जीवन संकटात

डोंगरांमधील सडे हे अनेक कारणाने महत्त्वाचे असतात. या सड्यांवरच या पक्षांचे जीवन फुललेले असते. प्रामुख्याने चांडोल, लार्क, टिटवी, नाईटजार, टर्न, खंड्या, रानकोंबड्या, मोर यासारखे पक्षी उघड्यावर अंडी घालतात. सध्या या पक्षांचा अंडी घालण्याचा काळ आहे.

काही अंड्यांमधून पिल्ले बाहेर आली आहेत. अशा वणव्यांमुळे हे सारे नष्ट होते. मानवनिर्मित धोक्यांमुळे अशा पक्षांची एक पिढी आपण संपवतो, असा पक्षी तज्ञांचा दावा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com