Goa Shigmotsav 2023 : मेरशी जंक्शनवर चित्ररथाची मोडतोड: दोन गटांत धक्काबुक्की

एक जखमी: गुन्हा दाखल
Crime News
Crime NewsDainik Gomantak

Goa Shigmotsav 2023: मेरशी येथील जंक्शनवर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिगमोत्सवातील चित्ररथ पणजीहून फोंडा येथे परतत असताना त्याची ठोकर स्क्रॅप जमा करणाऱ्या एका सायकलस्वाराला बसली. या घटनेमुळे तेथे दोन गटांत तंटा होऊन चित्ररथाची किरकोळ मोडतोड केली.

प्रकरण हमरीतुमरीवर येऊन धक्काबुक्की झाली. याप्रकरणी दोन गटांमधील व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.

Crime News
Mahadayi Water Dispute : म्‍हादईचे पाणी पळविणाऱ्या कर्नाटकसाठी सावंतांचा प्रचार

फोंडा येथील शिगमोत्सवातील चित्ररथ मिरवणूक संपल्यानंतर मेरशी जंक्शनवर पोहचला असता त्याची ठोकर सायकलवरून जाणाऱ्या एका स्‍क्रॅपवाल्याला बसली. त्यामुळे खाली पडून त्याला किरकोळ दुखापत झाली.

या सायकलचालकाने चित्ररथातील व्यक्तींना जाब विचारला असता त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी सायकलचालकाने सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि या घटनेची माहिती दिली. काही क्षणातच मेरशीतील काही युवकांनी या चित्ररथाचा पाठलाग करून तो रस्त्यामध्येच अडवला.

Crime News
शिवोलीत दुभत्या गाईची हत्या; दुष्कृत्यामुळे स्थानिकांत संताप

एक जखमी: गुन्हा दाखल

हे प्रकरण हमरीतुमरीवर आले असता, त्याची माहिती जुने गोवे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत दोन्ही गटांतील लोकांना बाजूला काढले. दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारींची नोंद करत अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

या घटनेत एकजण किरकोळ जखमी झाला. त्याला रात्रीच उपचारानंतर गोमेकॉ इस्पितळातील डॉक्टरांनी घरी पाठवल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com