आर्थिक मंदीचे सावट सर्वदूर दिसत आहे. अशात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली आहे. कर्मचारी कपातीचा सर्वात मोठा फटका आयटी कर्मचाऱ्यांना बसला आहे. असाच एक तरूण ज्याला देखील कामावरून काढून टाकण्यात आले. पण, कामावरून कमी केल्यानंतर त्याला गोव्यात खऱ्या अर्थाने नवी प्रेरणा मिळाली असे तो म्हणतो. आणि या प्रेरणेला एक डॉक्युमेंटरी आणि एक जीवन बदलणारी ओळ कारणीभूत ठरली असे त्याचे मत आहे.
अमित भाटिया असे या तरूणाचे नाव आहे. मुळचा पुण्याचा असलेला हा तरूण गोव्यात आला असता त्याने एक डॉक्युमेंटरी (माहितीपट) पाहिली, या माहितीपटामुळे त्याचे आयुष्य बदलले असे तो म्हणतो. एवढेच नव्हे तर तो आपल्या कंपनीच्या सेवा जागतिक कंपन्यांना विनामूल्य पुरवत आहे. यासाठी फक्त एकच अट आहे आणि ती म्हणजे समोरच्या कंपनीने कोणत्याही धर्मादाय संस्थेला दान द्यायला हवं.
भाटिया सात वर्षे टेक कंपनी फॉरेस्टरमध्ये सीएक्स विश्लेषक म्हणून काम करत होते. त्यांना फेब्रुवारीमध्ये कामावरून काढून टाकण्यात आले. यामुळे धक्का बसलेल्या भाटियांना गोव्यात प्रेरणा मिळाली.
अमित भाटिया यांनी लिंक्डइन या सोशल प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "संस्थापक सुबोध केरकर यांच्या गोवा संग्रहालयाला मागील आठवड्यात भेट दिली. मी येथे एक माहितीपट पाहिला. येथे लिहेलल्या ओळी मी कधीच विसरणार नाही."
"लाटा दुभंगल्या जातात तेव्हा वाळू खाली सरकत जाते. बहुतेक लाटा अगोदरच ओली असलेल्या वाळूला भिजवतात. त्यानंतर एक मोठी लाट पुढे जाते आणि सुक्या वाळूला भिजवते. तुम्ही काहीही करत असाल... त्यात नवीन वाळू ओली करा." हे वाक्य भाटिया यांनी शेअर केले आहे. या वाक्यानेच भाटिया यांना प्रेरणा मिळाली असे त्यांनी म्हटले आहे.
"मार्च 2023 मार्चपासून, पुढील तीन महिन्यांसाठी मी माझे संपूर्ण CX कौशल्य जगभरातील सर्व आकारांच्या कंपन्यांसाठी खुले करत आहे. यासाठी मी कोणतेही शुल्क घेणार नाही. माझी फक्त एकच मागणी आहे. माझ्या कामाच्या बदल्यात, तुम्ही तुमच्या आवडीच्या धर्मादाय संस्थेला योग्य दान द्यावे." असे अमित भाटिया यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.