Mahadayi Water Dispute: म्हादईसाठी अखेर जनआंदोलन; 'या' तारखेपासून एल्गार

आरजी पक्षाने जनआंदोलनासाठी घेतला पुढाकार
Mahadayi water dispute in Goa
Mahadayi water dispute in Goa Dainik Gomantak

म्हादई नदीवरील कळसा, भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिल्याचे २९ तारखेला जाहीर झाले. त्यानंतर गोव्यातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. विरोधी पक्षांनी भाजप सरकारला धारेवर धरले होते. मात्र, आठवडा उलटूनही पक्ष केवळ आंदोलनाची भाषा करत असताना प्रत्यक्षात कृती करत नव्हते. याबाबत ‘गोमन्तक’ने कानपिचक्या दिल्यानंतर म्हादईसाठी जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. याकरिता आरजी या पक्षाने पुढाकार घेतला असून रविवारी आझाद मैदानावर या आंदोलनाची ठिणगी पेटणार आहे. यावेळी पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Mahadayi water dispute in Goa
Quepem : केपेत पोस्ट मास्टरचा ग्राहकांच्या पैशांवर डल्ला; हडपले 'इतके' लाख रुपये

कोणत्याही परिस्थितीत म्हादईचे पाणी वळवू द्यायचे नाही, यासाठी आता रस्त्यावर उतरत जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. सध्या तरी आरजीने यासाठी पुढाकार घेतला असला तरी पर्यावरण प्रेमी तज्ज्ञ, कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठबळ द्यायचे ठरविले आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होणार, अशी अपेक्षा आहे. तर म्हादईसाठी गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आरजीकडून करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी यासंबधीचा खटला सुनावणीसाठी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तो पटलावर आलाच नाही. त्यामुळे राज्य सरकारवर एकप्रकारची नामुष्की ओढावली आहे. आता सरकारची धावपळ सुरू असून हा खटला तातडीने सुनावणीसाठी यावा, यासाठी विधिज्ञांची मदत घेण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात हा खटला कधी सुनावणीसाठी येणार, याचा अद्याप पत्ता नाही.

Mahadayi water dispute in Goa
Calangute : अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात कळंगुट ग्रामस्थ एकवटले; 8 जानेवारीला मुक मोर्चा

दुसरीकडे, राज्याचे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची गुरुवारी भेट घेऊन राज्यातर्फे आपले निवेदन सादर करत पाणी वळविण्यासाठी दिलेली डीपीआर मंजुरी मागे घ्यावी, तसेच तातडीने जल प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी केली आहे.

म्हादईसाठी प्रत्यक्षात रस्त्यावरची लढाई सुरू नसली तरी नेटकऱ्यांनी सरकारवर टीकेचा झोड उठविला आहे. सरकारबरोबर विविध राजकीय पक्षांनाही त्यांनी धारेवर धरले असून काँग्रेस, भाजप, गोवा फॉरवर्ड, मगोप या पक्षांवरही जोरदार टीका होऊ लागली आहे. तर दुसरीकडे म्हादईवरील विविध गाणी, गीते, लोकगीते सोशल मीडियावर गाजू लागली आहे. चित्रकार, साहित्यिक, कलाकार आपला कुंचला सरसवत असून या माध्यमातूनही म्हादई वळविण्याच्या प्रयत्नावर टीका करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com