Ganesh Chaturthi 2023: यंदा सरपंचांसह पंचांची चतुर्थी मानधनाविनाच!

Ganesh Chaturthi 2023: सरपंच व पंचांना सरकारने गेले वर्षभर मानधनच दिले नव्हते
Ganesh Chaturthi 2023 Festival In Goa
Ganesh Chaturthi 2023 Festival In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi 2023: वर्षभराने एकरकमी मानधन मिळणार म्हणून सरपंच आणि पंच यांच्यात खुशीचे वातावरण होते. मानधनापोटी पंचायतींत अनुदान जमा झाले; पण ते संबंधितांच्या खात्यावर जमा न झाल्याने त्यांना गणेश चतुर्थी मानधनाविनाच साजरी करावी लागली.

हे मानधन मिळणार आणि चतुर्थी साजरी करणार, अशी कोणाही सरपंच, पंचांची आर्थिक स्थिती नसली तरी हे मानधन मिळणार, त्याबदल्यात काय करता येईल याचे एक नियोजन त्यांच्या पातळीवर केले गेले होते.

सरपंच व पंचांना सरकारने गेले वर्षभर मानधनच दिले नव्हते. त्यामुळे अधूनमधून हे मानधन देण्याविषयी सरकारला आठवण करून दिली जात होती. कल्याणकारी योजनांचा लाभ चतुर्थीपूर्वी मिळावा यासाठी लाभार्थ्यांकडून सरकारवर रेटा वाढल्यानंतर या थकीत मानधनाचा विषयही चर्चेत आला होता.

Ganesh Chaturthi 2023 Festival In Goa
Goa Monsoon Update: पणजीत 36 तासांत 6 इंच पाऊस! ऐन चतुर्थीत गणेशभक्तांची तारांबळ...

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी गणेश चतुर्थीपूर्वी एकरकमी मानधन देऊ, असे जाहीर केले होते. एकदाच मानधन मिळाल्याने ते घेतल्यासारखे वाटेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती.

गेले वर्षभर आर्थिक तंगीत असलेल्या सरकारने हे मानधन थकवले होते. अखेर मानधन मिळेल, हा शब्द पाळण्यासाठी चतुर्थीला दोन दिवस शिल्लक असताना १५ सप्टेंबर रोजी या मानधनापोटी अनुदान पंचायतींच्या खात्यांवर जमा केले.

एका पंचायत सचिवांकडे अनेक पंचायतींचा ताबा असल्याने अनुदान जमा झाल्यानंतर सोपस्कार पूर्ण करून सरपंच व पंचांच्या नावे धनादेश जारी करण्यासाठी त्यांना धावाधाव करावी लागणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे सोमवारी कोणत्या एका पंचायतीचा ताबा होता, त्या ठिकाणचे धनादेश दुपारपर्यंत पंचायत सचिवांनी जारी केले.

ते सरपंच व पंचांच्या हाती पडेपर्यंत दुपार उलटून गेली. त्यामुळे ते बॅंकेत जमा करू शकले नाहीत. त्याच पंचायत सचिवाकडे ज्या अन्य दोन पंचायतींचा ताबा आहे, त्या पंचायतींच्या सरपंच व पंचांना आजवर धनादेश मिळालेलेच नाहीत. अनेक पंचायत सचिव चतुर्थीमुळे रजेवर आहेत.

सरकार लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा गवगवा करत असले तरी सरपंच व पंचांचे मानधन धनादेशाद्वारे जमा केले जात असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

पंचायत संचालनालय किंवा गटविकास अधिकारी कार्यालयाकडून थेट सरपंच व पंचांच्या बॅंक खात्यात मानधन जमा केले असले तर मागील शुक्रवारीच सर्वांना मानधन मिळाले असते.

सरकारकडून चतुर्थीच्या तोंडावर पंचायतींच्या खात्यांवर सरपंच, पंचांच्या मानधनाची रक्कम जमा केली आहे. पंचायतींच्या पातळीवर मानधनाचे धनादेश जारी करायचे असतात. तेथे उशीर झाला असू शकतो.

- माविन गुदिन्हो, पंचायतमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com