World MSME Day आपण गोवा राज्याला सर्वसमावेशक राज्य बनविले पाहिजे. ही सर्वसमावेशकता केवळ दानधर्मापुरती नको तर नागरिकांचा मूलभूत अधिकार म्हणून या सर्वसमावेशकतेचा विकास केला पाहिजे.
दिव्यांगजनांचे सक्षमीकरण करणे आणि समाजात त्यांना मानसन्मानाने वावरण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करणे ही गरज आहे, असे दिव्यांगजन आयोगाचे सचिव ताहा हाजिक म्हणाले.
दिव्यांगजन आयोग, गोवा राज्य उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाच्या सहकार्याने सूक्ष्म-लघुमध्ये उद्योग दिनाच्या निमित्ताने मंगळवारी (ता.२७) पणजीतील ईडीसी हाउसमध्ये ‘खासगी क्षेत्रात दिव्यांगजनांसाठी रोजगार संधी’ याविषयावर मार्गदर्शन सत्र झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाच्या संचालिका श्वेतिका सचन यांच्या हस्ते झाले.
यावेळी आयोगाचे सचिव ताहा हाजिक, राज्य उद्योग संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष तसेच बीएनआय गोवा विभागाचे कार्यकारी संचालक राजकुमार कामत, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक आणि गोवा चेंबर ऑफ कॉर्मर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राल्फ डिसोझा यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शाश्वत विकास, सर्जनशीलतेला प्रोत्साहन आणि लाखो लोकांना उपजीविका उपलब्ध करणे यासाठी सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांची भूमिका आणि त्यांच्याकडील रोजगार संधी याबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
खासगी क्षेत्रामध्ये दिव्यांगजनांना रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्याबाबत या सत्रामध्ये भर देण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.