Colvale Jail: कोलवाळ कारागृह ‘स्वयंपूर्णते’च्या दिशेने

मुख्यमंत्र्यांचा पुढाकार : गोशाळेची उभारणी; महिला कैदी करणार सॅनिटरी पॅड्‌सची निर्मिती
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Colvale Jail कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला स्वयंरोजगारात ‘स्वयंपूर्ण’ करण्याच्या अनुषंगाने तुरुंगातील कैद्यांसाठी या ठिकाणी संसाधन केंद्रे सुरू केली आहेत.

तसेच कारागृहातील कैद्यांना रोजगार व महिला कैद्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी येथे सॅनिटरी पॅड्‌स निर्मिती करणाऱ्या मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे.

कैद्यांना परत भविष्यात सर्वसामान्य आयुष्य जगता यावे यासाठी कौशल्य विकास माध्यमातून रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी कारागृहात उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. मंगळवारी (ता.२५) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सर्व संसाधन केंद्रांचे उद्‌घाटन करण्यात आले.

CM Pramod Sawant
Goa Congress: सांकवाळप्रकरणी ‘एफडीए’ आपली जबाबदारी झटकतेय !

कारागृहात गोशाळा उभारली असून येथील कैदी या गुरांची देखभाल करतील. या गोठ्यात सात गाई व एक बैल आहे. या गोठ्याच्या माध्यमातून भविष्यात गोबर गॅसची निर्मिती केली जाईल.

आधारकार्डचे वितरण

कोलवाळ कारागृहात कागदपत्रांच्या आधारे काही कैद्यांना यावेळी आधारकार्डचे वितरण करण्यात आले. तसेच हस्तकला केंद्र, चपाती बनविण्याचे मशीन उपलब्ध करून दिले.

कारागृहला पूर्णतः स्वयंपूर्ण बनविण्यासाठी हा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे सर्व उपक्रम सरकारी खर्चातून नव्हे तर सीएसआर कार्यक्रमांतर्गत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

CM Pramod Sawant
Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

व्यसन किंवा वाईट कृतीमुळे या कैद्यांकडून भूतकाळात चूक घडली असावी. परंतु समाजाने कैद्यांना त्याच नजरेतून पाहू नये.

या कैद्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे आम्ही कैद्यांकडे सकारात्मक नजरेतून पाहिल्यास त्यांच्यात लवकर सुधारणा होण्यास मदत होईल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com