Fertilizer Production in Goa: खत निर्मितीत 'ही' पंचायत ठरलीय गोव्यात अव्वल

पंचायतीचा उपक्रम: 22 रोजी जागतिक जैवविविधता मेळाव्यात खत विक्री
Fertilizer production
Fertilizer productionDainik Gomantak
Published on
Updated on

Fertilizer Production in Goa आगोंद ग्रामपंचायत क्षेत्रात कचरा प्रक्रिया प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्यात येत आहे. अशा प्रकारे खत निर्मिती करणारी ही पंचायत गोव्यात अव्वल ठरली आहे.

22 मे रोजी जागतिक जैवविविधता मेळाव्यात कचऱ्यापासून तयार खताची विक्री करण्यात येणार आहे, अशी माहिती पंचायतीचे सचिव सुशांत नाईक गांवकर यांनी दिली.

आगोंद पंचायतीची ग्रामसभा भुरम येथील सभागृहात सरपंच फातिमा रॉड्रिग्स यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

उपसरपंच प्रितल फर्नांडिस, पंचसदस्य करुणा फळदेसाई, जोन फर्नांडिस, केनीशा फर्नांडिस गटविकास अधिकारी कार्यालयाचे भिवा वेळीप निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

Fertilizer production
INSV Tarini: ऐतिहासिक! सहा महिने अंगावर झेलल्या महाकाय लाटा; नौदलाची धाडसी मोहीम फत्ते, तारिणी गोव्याच्या दिशेने

आगोंद पंचायतीमध्ये आठ विकास कामांची निविदा काढण्यात आली आहे. यामध्ये मूडकूड, पार्वे, मुडचेळी, काराशीरमळ येथील रस्ते तसेच गटार बांधकाम यांचा समावेश आहे. स्पीड ब्रेकर घालण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

या भागातील स्पीड ब्रेकरना रंग देखील लवकरच देण्यात येणार. धवळखाजन भागात बेवारस कुत्री चावा घेत असल्याच्या तक्रारी पंचायत कार्यालयाला सादर करण्यात आलेल्या आहेत. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर लवकरच त्यावर तोडगा काढला जाईल असे सांगितले.

नदीत घाण सोडणाऱ्या व कचरा टाकण्याचे प्रकार वाढत असल्याबद्दल ग्रामसभेत चिंता व्यक्त करण्यात आली. या विषयावर गरमागरम चर्चा करण्यात आली.

त्यानंतर आगोंद जैवविविधता व्यवस्थापन समिती व पंचायत मंडळाने निरीक्षण करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या भागातील कचरा प्रक्रिया प्रकल्पा करता कचरा उचल करण्यासाठी एकूण 7 कर्मचारी व 1 वाहक नियुक्त करण्यात आला आहे.

Fertilizer production
Stray Dog Issue in Goa: राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली, गांभीर्याने पावले उचलण्याची गरज

धवळखाजन येथे बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी धोकादायक खड्डे पडलेले असून ते बुजविण्यासाठी पावले उचलण्याची मागणी यावेळी ग्रामस्थ नारायण देसाई यांकडून करण्यात आली.

यावेळी झालेल्या चर्चेत गणपत नाईक दसाई, किरण नाईक गावकर, नारायण देसाई, नितीन ना. गावकर, रुपा पागी, नवनाथ नाईक गावकर, नंदकिशोर फळदेसाई, त्रिफोन कुतिन्हो आदी ग्रामस्थांनी भाग घेतला.

मोफत खत वाटप

सरकारतर्फे दिलेल्या 1 मशिनमधून खत तयार व्हायला 7 दिवस लागतात तर खाजगी मशिनरीद्वारे लवकर खत तयार केले जात आहे.

या भागातील एकत्रीत केलेल्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे, अशी माहिती सचिव गांवकर यांनी दिली. सध्या 1 टन खत तयार झालेले असून सर्व उपस्थित ग्रामस्थांना 2 किलो कचऱ्यापासून बनविलेले खत मोफत देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com